मुंबई :  राष्ट्रवादीचे नेते आणि मादी मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokat) यांना उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. तसेच या याचिकेवरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत एक लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. माणिकराव कोकाटेंना फक्त दोन वर्षांची शिक्षा असल्याने त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आल्याचं कोर्टाने म्हटलं आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या निकालानंतर याचिकाकर्ते सर्वोच्च न्यायालयात आजच जाणार आहेत. माणिकराव कोकाटे दोषी आहेत. त्यामुळं त्यांची आमदारकी जाणार असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. 

Continues below advertisement

बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिकांचा लाभ घेतल्याप्रकरणी कोकाटेंना दोन वर्षाची शिक्षा

राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात युक्तिवाद सुरु आहे. सत्र न्यायालयाने कोकाटेंना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्याच्या विरोधात माणिकराव कोकाटे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला स्थगितीची याचिकेत मागणी करण्यात आली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिकांचा लाभ घेतल्याप्रकरणी माणिकराव कोकाटे यांना सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावणी आहे. याप्रकरणी सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात माणिकराव कोकाटेंनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या याचिकेवर न्या. आर एन लढ्ढा यांच्या एकलपीठासमोर सुनावणी पार पडली.

माणिकराव कोकाटे यांची आमदारकी धोक्यात

बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिकांचा लाभ घेतल्याप्रकरणी अडचणीत आलेले माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. असं असलं तरी अद्याप त्यांच्या अडचणी कमी झालेल्या नाहीत. एकीकडे त्यांना अटकेची भीती असताना दुसरीकडे त्यांची आमदारकी देखील धोक्यात आहे. उच्च न्यायालयाच्या निकालानंतर याचिकाकर्ते सर्वोच्च न्यायालयात आजच जाणार आहेत. माणिकराव कोकाटे दोषी आहेत. त्यामुळं त्यांची आमदारकी जाणार असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. 

Continues below advertisement

हायकोर्टाने दिलेल्या निकालाची प्रत प्राप्त झाल्यावर विधिमंडळ निर्णय घेणार 

दरम्यान, माणिकराव कोकाटेंबाबत हायकोर्टाने दिलेल्या निकालाची प्रत प्राप्त झाल्यावर विधिमंडळ निर्णय घेणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळं कोकाटेंची आमदारकी राहणार की जाणार? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे यांना बायपास करायला सांगितली आहे. चार ब्लॉकेज असल्याचं सांगण्यात आले आहे. यावर अजून माणिकराव कोकाटे यांना सांगितला आहे पण त्यांनी अजून निर्णय घेतला नाही असा डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे