विशेष म्हणजे गिरासे दोन दिवस अचानक बेपत्ता झाले होते. त्यानंतर 1 एप्रिलला त्यांचा शोध लागला. मात्र त्यांचे डोक्यावरचे केस आणि मिशी कापलेल्या अवस्थेत ते घरी परतले. तेव्हापासून ते तणावात होते.
माणिकराव गावित यांचे निष्ठावान असलेले भगवान गिरासे यांनी आज (5 एप्रिल) सकाळी साडेदहाच्या सुमारास गळफास घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यांची प्रकृती खालावल्याचं कळतं. त्यांनी हे पाऊल का उचललं हे अद्याप समजू शकलेलं नाही.
तिकीटवाटपावरुन नाराज गावित यांची मनधरणी करण्यासाठी 30 मार्च रोजी मुंबईतील टिळक भवनात बैठक आयोजित केली होती. यावेळी माणिकराव गावितांसोबत भगवान गिरासेही उपस्थित होते. मात्र बैठकीनंतर भगवान गिरासे अचानक बेपत्ता झाले होती. दोन दिवसांनंतर (1 एप्रिल)ते नंदुरबारमधील घरी परतले. परंतु त्यांच्या शारीरिक हालचाली ठीक नव्हत्या. ते कोणाशी बोलत नव्हते आणि आज त्यांनी गळफास घेतला.
VIDEO | काँग्रेस नेते माणिकराव गावित यांचे स्वीय सहायक बेपत्ता
संबंधित बातम्या
आदिवासी असल्यामुळं अशी वागणूक देता का? खर्गे न भेटल्याने माणिकराव गावितांचा संताप
काँग्रेसला धक्क्यावर धक्के, माणिकराव गावितही पक्ष सोडण्याच्या तयारीत