मुंबई : महिलांना पुरेशा प्रमाणात लोकसभा निवडणुकांची उमेदवारी न दिल्याबद्दल भाजप प्रवक्त्या शायना एनसी यांनी संताप व्यक्त केला. तृणमूल काँग्रेस आणि बीजेडीचा दाखला देत शायना एनसी यांनी स्वपक्षासह इतर प्रमुख पक्षांचे कान टोचले आहेत.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 41 टक्के, तर ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी 33 टक्के महिलांना उमेदवारी दिल्याबद्दल शायना एनसी यांनी कौतुक केलं. इतर पक्षांनी या नेत्यांचा कित्ता गिरवावा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघात प्रमुख पक्षांनी केवळ 13 महिलांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याबद्दल शायना एनसी नाराज आहेत. क्षमता दाखवण्यासाठी संधी मिळण्याची आवश्यकता आहे. प्रतिभा दिसण्याची गरज आहे. निवडणुकीच्या आखाड्यात अधिकाधिक महिलांना उतरवण्याची गरज शायना यांनी बोलून दाखवली.
चिंतेची गोष्ट म्हणजे, मूलभूत मानवी हक्कांवर आपण अद्याप संवाद आणि चर्चा करत बसलो आहोत. म्हणूनच सार्वजनिक जीवनात सर्व महिलांनी 33 टक्के आरक्षणासाठी सामूहिक, एकत्रित, जागृत प्रयत्न करणे आवश्यक आहे, असंही त्या म्हणतात.
प्रीतम मुंडे, रक्षा खडसे, सुप्रिया सुळे, पूनम महाजन, हीना गावित, भावना गवळी या विद्यमान खासदारांसह कांचन कुल, प्रिया दत्त, उर्मिला मातोंडकर, डॉ. भारती पवार, चारुलता टोकस यासारख्या मोजक्या उमेदवारांना प्रमुखा चार पक्षांनी उमेदवारी दिली आहे.
अल्प महिलांना उमेदवारी, शायना एनसी भाजपसह सर्व प्रमुख पक्षांवर नाराज
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Apr 2019 11:51 AM (IST)
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 41 टक्के, तर ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी 33 टक्के महिलांना उमेदवारी दिल्याबद्दल शायना एनसी यांनी कौतुक केलं.
फोटो सौजन्य : गेट्टी इमेजेस
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -