स्टंटबाजी महागात, मद्यधुंद तरुणाचा गोकाक धबधब्यात पडून मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 18 Jun 2018 08:30 AM (IST)
रमजान ईदचा सण साजरा करून 35 वर्षीय उस्मान त्याच्या भावासोबत धबधब्यावर गेला होता. मात्र त्यावेळी मद्यधुंद अवस्थेतील उस्मान अतिउत्साहात धबधब्याच्या टोकापर्यंत आला.
बेळगाव: बेळगावातील घटप्रभा नदीवर असणाऱ्या गोकाक धबधब्यावर गेलेल्या तरूणाला स्टंट करणं जीवावर बेतलं आहे. उस्मान काझी असं या तरुणाचं नाव आहे. रमजान ईदचा सण साजरा करून 35 वर्षीय उस्मान त्याच्या भावासोबत धबधब्यावर गेला होता. मात्र त्यावेळी मद्यधुंद अवस्थेतील उस्मान अतिउत्साहात धबधब्याच्या टोकापर्यंत आला. तिथे तो विविध स्टंट करु लागला. थबथब्यावरुन तो एक पायरी खाली उतरला. तिथून त्याचा पाय घसरला आणि थेट 50 फूट खोल धबधब्यात कोसळल्याने त्याचा जीव गेला. हा तरुण घटप्रभा इथलाच रहिवासी असल्याची माहिती मिळतेय. केवळ अतिउस्ताहामुळेच त्याचा जीव गेल्याचं व्हिडीओतून दिसतं. या घटनेचा व्हिडीओही उपस्थित पर्यटकांनी शूट केला. गेल्यावर्षीही दारुच्या नशेत दोन तरुणांनी आंबोली घाटात जीव गमावल्याची घटना घडली होती. आंबोलीतील कावळेसाद दरीत कोसळून दोघांचा मृत्यू झाला होता. हे तरुण फुल्ल दारुच्या नशेत स्टंटबाजी करत होते. सुरक्षा कठड्यावर बसून त्यांची मस्ती सुरु होती. एकाच्य हातात दारुची बाटली होती. ती बाटली तो पँटमध्ये ठेवताना व्हिडीओत दिसत होतं. त्यातच त्यांचा तोल जाऊन 600 फूट खोल दरीत कोसळले होते. पावसाळ्याची मजा घ्या पण जीवावर बेतेल असे धाडसी प्रयोग करायला जाऊ नका, असं आवाहन करण्यात येत आहे. VIDEO: संबंधित बातम्या आंबोलीजवळच्या कावळेसाद पॉईंटवर नेमकं काय घडलं? VIDEO : सेल्फी नव्हे, दारुच्या नशेत तरुणांचा दरीत कोसळून मृत्यू