मात्र त्याचवेळी एक उमेदवार असा आहे, ज्याने आपला वचननामा थेट स्टॅम्प पेपरवर लिहून, नोटरीही केली आहे.
देवा खंडू पाटील असं या उमेदवाराचं नाव असून, ते प्रभाग 9 ब मधून अपक्ष निवडणूक लढवत आहेत. देवा पाटील हे सामाजिक कार्यात क्रियाशील असतात.
त्यांनी केवळ आश्वासन न देता, शासकीय मुद्रांकावर वचननामा लिहून, त्याची नोटरी केली. इतकंच नाही तर वचन पूर्ण न केल्यास मतदारांनी आपल्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, असं या वचननाम्यात लिहिलं आहे.
हा आगळावेगळा वचननामा सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.
देवा पाटील यांचे मोबाईल विक्रीचे दुकान आहे. त्यांनी वचननाम्यात आपली संपत्ती जाहीर केली असून त्यात जंगम मालमत्तेसह पती-पत्नीचे वार्षिक उत्पन्न दहा लाख, संपत्ती एक कोटी, तर कर्ज एक कोटी 17 लाख रुपये असल्याचं दाखविले आहे.
भ्रष्टाचार, भयमुक्त कारभार आणि विकास कामांसाठी आपली उमेदवारी असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
प्रभागातील नागरिकांच्या समस्या प्रशासनापुढे मांडता याव्या, अडचणींचा तात्काळ निपटारा व्हावा, यासाठी अधिकारी आणि नागरिकांच्या उपस्थितीत दरमहा 'वार्ड संसद' भरवणार. तसंच तक्रारी मांडण्यासाठी 24 तास हेल्पलाईन, वेब आणि टोल फ्री क्रमांक सुरु करुन नागरिकांच्या तक्ररींचा निपटारा करु, असंही या वचननाम्यात नमूद करण्यात आलं आहे.