गोंदिया : गाई-म्हशी शेळी दूध देतात, हे तुम्हा-आम्हाला माहित आहे. मात्र, बोकड दूध देतो, असं म्हटलं तर....? ऐकून आश्चर्याचा धक्का बसेल, पण हे खरं आहे. गोंदियातील एक बोकड चक्क दूध देतो.
गोरेगाव तालुक्यामधील पिपरटोला गावातील कटरे कुटुंबीय हे गेल्या 50 वर्षांपासून शेळी पालनाचा व्यवसाय करत आहेत. कटरे कुटुंबाकडे सध्या 40 हून अधिक दुभत्या बकऱ्या शेळ्या आहेत. त्यामुळे प्रजननासाठी बोकडाची गरज भासते.
तीन महिन्यांपूर्वी पिपरटोला गावात मेंढी पालन करणारे लोक आले होते. उच्च दर्जाच्या शेळ्या उत्पादित करण्यासाठी त्यांच्याकडून कटरे कुटुंबीयांनी तोतापुरी प्रजातीचा बोकड खरेदी केला. इतर बकऱ्यांप्रमाणे बोकडाला देखील आंघोळ घालून उन्हात उभे केले असता, बकऱ्याच्या स्तनातून दूध टपकायला लागले. पहिल्या दिवशी या ‘अजूबा’ नावाच्या बोकडाने 150 मिली दूध दिले.
दूध देणाऱ्या अजूबा बोकडाविषयी गोरेगावच्या पशु वैधकीय अधिकऱ्यांना माहिती देण्यात आली. डॉक्टरांनी बोकडाची वैद्यकीय तपासणी केली असता, बोकडाला गानोकोमोसटिया नावाचा आजार झाला असल्याने आणि बोकडाच्या शरीरातील हार्मोन्समध्ये बदल झाल्याने बोकड दूध देत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
पहिल्यांदाच बोकड दूध देत असल्याचे आढळलं आहे, असे डॉक्टर सांगतात. वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या टीमसह बोकडाची वैद्यकीय तपासणी करून त्याचा अहवाल वरिष्ठ अधिकऱ्यांना पाठवून या बोकडावर संशोधन करु आणि याचा खर्चही पशु संवर्धन विभाग उचलेल, अशीही माहिती पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
25 हजार रुपयांना खरेदी केलेल्या या बोकडाला आज दीड लाख रुपयांपर्यंतची मागणी आहे. मात्र, पशु संवर्धन विभागाने या बोकडावर संशोधन करण्यासाठी दत्तक घेण्याची तयारी दर्शवल्याने शेळी मालक सतीश कटरे यांनी बोकडाची विक्री न करण्याचा निर्णय घेतला आहे.
बोकड दूध देतो...
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
31 Jul 2017 08:28 AM (IST)
गाई-म्हशी शेळी दूध देतात, हे तुम्हा-आम्हाला माहित आहे. मात्र, बोकड दूध देतो, असं म्हटलं तर....? ऐकून आश्चर्याचा धक्का बसेल, पण हे खरं आहे. गोंदियातील एक बोकड चक्क दूध देतो.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -