रायगड : रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात असलेल्या डब्ल्यू वेअरहाऊस गोडाऊनला शनिवारी रात्री 9 च्या सुमारास भीषण आग लागली. अचानक लागलेल्या या आगीमुळे अनेकांची तारांबळ उडाली होती. काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.


या आगीची भीषणता एवढी होती की या आगीत संपूर्ण गोडाऊन जळून खाक झालं आहे. आगीमुळे गोडाऊनमध्ये ठेवण्यात आलेले हजारो एसी युनिट देखील जळाले आहेत. दरम्यान आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते.


अग्निशमन दलाच्या सुमारे सहा गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. परंतु गोडाऊनला लागलेल्या आगीमुळे गोडाऊनमधील एसी युनिटचे मोठ्या प्रमाणात स्फोट सुरु राहिल्याने आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण झाले होते.


रात्री उशीरा या आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले, मात्र उशीरापर्यंत सुरु राहिलेल्या या आगीमुळे संपूर्ण गोडाऊन जळून खाक झाले आहे.


व्हिडीओ