Majha Sanman 2023 : वाबळेवाडीच्या ( Wable Wadi) शाळेचा कायापालट करुन महाराष्ट्राचे नाव गाजवणाऱ्या वारे गुरुजींना (Ware Guruji) एबीपी माझाच्या वतीनं 'माझा सन्मान' पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आलं. एबीपी माझाच्या यंदाच्या 'माझा सन्मान' पुरस्कारांचे (Majha Sanman 2023) वितरण झालं. यामध्ये विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला आहे. वारे गुरुजींनी पुणे जिल्ह्यातील शिक्रापूरजवळील वाबळेवाडी शाळेचा कायापालट केला आहे. यामुळं महाराष्ट्राचं नाव जगभरात गाजलं. त्यांच्या याच कार्यचा सन्मान एबीपी माझानं केला आहे. 'माझा सन्मान' पुरस्कार सोहळा आज (26 ऑगस्ट) रात्री आठ वाजता आणि उद्या (27 ऑगस्ट) रात्री सात वाजता एबीपी माझा चॅनेलवर पाहता येणार आहे.
वाबळे गुरुजींच्या मेहनतीतून वाबळेवाडीची जिल्हा परिषदेची शाळा आंतरराष्ट्रीय झाली
काही दिवसांपूर्वी वाबळेवाडीची जिल्हा परिषदेची शाळा म्हटलं की नाकं मुरडली जायची. पण, आता इथं प्रवेशासाठी तीन वर्षांची वेटिंग लिस्ट आहे. केवळ व्यवस्थेकडे बोट दाखवत न बसता वारे गुरुजींनी हे करुन दाखवलं आहे. त्यांच्या कल्पनेला आणि मेहनतीला अनेक हातांची साथ लाभली. वाबळेवाडीची जिल्हा परिषदेची ही शाळा आंतरराष्ट्रीय झाली आहे. आधी जिल्हा परिषदेची शाळा म्हंटलं फारसं लक्ष दिलं जात न्वहतं. आता इथं प्रवेशासाठी तीन वर्षांची वेटिंग लिस्ट लागली आहे. हा फार मोठा बदल वारे गुरुजींच्या कल्पकतेमुळं झाला आहे.
शाळेचा कायापालट करत असताना वारे गुरुजींवर अनेक आरोप
केवळ व्यवस्थेकडे बोट दाखवत न बसता वारे गुरुजींनी हे करुन दाखवलय. शाळेचा कायापालट करत असताना वारे गुरुजींवर अनेक आरोपही झाले, बदली झाली. पण बदली होऊनही गेलेल्या जालिंदरनगर शाळेचाही त्यांनी सात महिन्यात कायापालट केला आहे. नवी पिढी ज्या ज्ञानमंदिरात घडते त्या ज्ञानमंदिरांना घडवणाऱ्या वारे गुरुजींना एबीपी माझा अत्यंत अभिमानाने माझा सन्मान पुरस्कार प्रदान करत आहे.
जालिंदरनगरच्या शाळेचाही वारे गुरुजींनी केला कायापालट
वारे गुरजींची बदली काही महिन्यांपू्र्वीच खेड तालुक्यातील कन्हेरसर गावातील जालिंदरनगरच्या शाळेत झाली. ही शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असतानाच वारे गुरूजींनी काही शाळेचा चेहरामोहराच बदलून टाकला आहे. गुरूजींच्या या शाळेत प्रवेश घेण्यासाठी आता रांगा लागत आहेत. या शाळेतील मुले फ्रेंच, जर्मनी, जपानी, इंग्रजीसारख्या परदेशी भाषा अगदी सहजपणे बोलतात. केवळ 100 ते 200 नव्हे तर एक हजारापर्यंतचे विद्यार्थ्यांचे पाढे तोंडपाठ आहेत. तंत्रज्ञानातही ही मुले एक पाऊल पुढे असल्याने वारे गुरूजी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: