मुंबई: संपूर्ण महाराष्ट्राला याड लावून झिंगाट बनवणाऱ्या सौराट चित्रपटातील आर्चीची भूमिका साकारणाऱ्या रिंकू राजगुरू आणि परशाची भूमिका साकारणाऱ्या आकाश ठोसरला माझा सन्मान पुरस्काराने गौरवण्यात आले


रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसरचा थोडक्यात परिचय

काही दिवसांपूर्वी जर ही नावं कोणाला विचारलं असतं, तर त्यांची ओळख सांगणारे अगदीच हाताच्या बोटावर मोजण्या इतपत भेटले असते.   मात्र, सैराट रिलीज झाला आणि त्यांनी साकरलेल्या आर्ची आणि परश्यानं अवघ्या महाराष्ट्राला याड लावलं. सातवीत असताना रिंकूने गमंत म्हणून सिनेमासाठी दिलेली अॉडिशन, आठवीत असताना झालेलं शूटिंग आणि नववीत झळकलेला सिनेमा.  या तीन वर्षांनी तिच्या आयुष्याची सगळी गणितच बदलून टाकली. पदार्पणातच अभिनयासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार पटकवत रिंकूने दिग्दर्शकाने टाकलेला विश्वास सार्थ ठरवला.

पैलवानकी करणाऱ्या आकाशने तर सिनेमाचं कधी स्वप्नंही पाहिलं नव्हतं.  कुस्तीच्या आखाड्यातून थेट रुपेरी पडद्यावर दाखल झालेल्या या वीरानं हे मैदानही तितक्याच तडफेनं जिंकलं. पहिल्याच सिनेमात लोकप्रियतेचं उत्तुंग शिखर गाठणाऱ्या या रिंकू राजगुरु  आणि आकाश ठोसरला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी एबीपी माझाच्या मन:पूर्वक शुभेच्छा !

संबंधित बातम्या

ललिता बाबरचा माझा सन्मान २०१६ पुरस्काराने गौरव


 

आपल्या आवजाने मंत्रमुग्ध करणाऱ्या महेश काळेंचा ‘माझा सन्मान २०१६’ने गौरव


 

स्वच्छतेला उद्योगाचं स्वरुप देणाऱ्या हणमंत गायकवाडांचा ‘माझा सन्मान 2016’ने गौरव


 

कलाक्षेत्रात आपले अढळ स्थान निर्माण करणाऱ्या डॉ. सुधीर पटवर्धन यांचा ‘माझा सन्मान 2016’ने गौरव


 

गरीब वृद्धांचे दु:ख दूर करणाऱ्या मार्क डिसूझा यांचा माझा सन्मान पुरस्काराने गौरव


 

संशोधन क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केलेल्या डॉ. शुभा टोळेंचा माझा सन्मान पुरस्काराने गौरव