- मुख्यपृष्ठ
-
बातम्या
-
महाराष्ट्र
#MajhaMaharashtraMajhaVision | माझा महाराष्ट्र माझं व्हिजनमध्ये सुरु आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचं व्हिजन
#MajhaMaharashtraMajhaVision | माझा महाराष्ट्र माझं व्हिजनमध्ये सुरु आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचं व्हिजन
सध्या कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सगळं काही थांबल्यासारखं चित्र आहे. काही ठिकाणी काही गोष्टी सुरु करुन दिलासा दिला असला तरी अद्याप जनजीवन सुरळीत झालेले नाहीत. अशात महाराष्ट्रासमोर अनेक समस्या देखील उभ्या ठाकल्या आहेत. या समस्यांवर मात करत नवा महाराष्ट्र कसा घडवायचा याबाबत राज्यातील महत्वाच्या नेत्यांचं व्हिजन जाणून घेण्याचा प्रयत्न एबीपी माझाने केला आहे.
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
31 Jul 2020 04:57 PM
बोलण्यापेक्षा प्रत्येकानं कामावर लक्ष द्यावं : छगन भुजबळ
माझा महाराष्ट्र माझं व्हिजनमध्ये सुरु आहे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचं व्हिजन
18 लाख क्विंटल धान्य केसरी कार्ड धारकांना वाटलं : छगन भुजबळ
लॉकडाऊनमुळे जे बंद पडलं आहे, ते पुन्हा सुरु करण्याची गरज : छगन भुजबळ
वन कार्ड वन नेशनमध्ये महाराष्ट्र पुढे : छगन भुजबळ
अन्न, वस्त्र आणि निवाऱ्यापेक्षाही अनेक गोष्टी महत्त्वाच्या : छगन भुजबळ
जर पुनश्च हरी ओम झाल्यानंतर, पुन्हा लॉकडाऊनची वेळ येऊ नये : छगन भुजबळ
कोविडच्या लढाईनंतरही आपल्याला अर्थचक्र सुरळीत करण्यासाठीची लढाई लढावी लागणार आहे : छगन भुजबळ
माझा महाराष्ट्र सर्व बाबतींत पुढे असला पाहिजे, पण कोविडच्या बाबतीत तो कुठेतरी अडखळतोय : छगन भुजबळ
क्रिडा, शौर्य, कला सर्व बाबतींमध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे : छगन भुजबळ
महाराष्ट्र या शब्दामध्येच महान राष्ट्र असा त्याचा अर्थ आहे : छगन भुजबळ
मराठी मालिकांचे प्रेक्षक कमी झालेले नाहीत, खूप कमी लोकच वेब सिरीज पाहतात, म्हणून मालिकांसाठी वेबसिरीज हे आव्हान नाहीच, निर्माते नितीन वैद्य यांचं मत
बोगस सोयाबीन बियाण्यांच्या तक्रारींबाबत कंपनीवर गुन्हा दाखल, ज्या कंपन्या दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई : दादाजी भुसे
मनोरंजन क्षेत्राची अवस्था बिकट, कोरोनावर लस येईपर्यंत थांबण्यात काही अर्थ नाही, महेश मांजरेकर यांचं मत
9 ऑगस्टला राज्यात वनभाज्या महोत्सवाचं आयोजित करणार : दादाजी भुसे
शेतीला प्रतिष्ठा मिळवून देणार. लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांना बांधावर जाऊन खतं, बियाण्यांचं वाटप : दादाजी भुसे
माझा माझा महाराष्ट्र माझं व्हिजनमध्ये सुरु आहे कृषीमंत्री दादाजी भुसे यांचं व्हिजन
आघाडी अधिक मजबूत होऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी ज्योक केला असेल : राजेश टोपे
सर्व रिक्त जागा भरणार आहे. गरज आहे तिथे रुग्णालय वाढवाणार. स्वच्छता, नम्रता आणि गुणवत्ता या त्रिसूत्रीवर काम करणार : राजेश टोपे
मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वातच हे सरकार सुरु आहे. तिन्ही पक्षांचे संबंध सलोख्याचे आहेत : राजेश टोपे
मुंबईकरांमध्ये हर्ड इम्युनिटी तयार होत आहे : राजेश टोपे
मुंबईकडे लक्ष दिलं याचा अर्थ इतर जिल्ह्यांकडे दुर्लक्ष केलं असं नाही : राजेश टोपे
सगळं सुरु करण्याच्या राज ठाकरे यांच्या मताशी सहमत आहे, पण टप्प्याटप्प्याने सुरु करावं लागेल, अनलॉकसाठी थम्बरुल आहे : राजेश टोपे
कोरोनासोबत जगत असताना एसएमएस म्हणजेच सोशल डिस्टन्सिंग-मास्क-सॅनिटायझर हे लक्षात ठेवावं : राजेश टोपे
माझा महाराष्ट्र माझं व्हिजनमध्ये सुरु आहे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचं व्हिजन
अजित पवार यांच्यासोबत सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न फसलेला : देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्रात अडीच लाखांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त, राज्याचा रिकव्हरी रेट 60 टक्क्यांच्या वर : राजेश टोपे
हे लिव्ह-इन रिलेशनशिप आहे, कुटुंब नाही, त्यामुळे हे सरकार टिकेल असं वाटत नाही : देवेंद्र फडणवीस
मुंबईत कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या वाढेल या भीतीने टेस्टिंग कमी : देवेंद्र फडणवीस
राज्य सरकारचं स्टेअरिंग नेमकं कोणाच्या हातात आहे हेच मला समजत नाही : देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र सरकारने कोरोनाशी ज्या ताकदीने लढायला हवं ते दिसत नाही, देशात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात : देवेंद्र फडणवीस
'मुख्यमंत्री असताना जे व्हिजन मी मांडत होतो. तेच व्हिजन माझं आताही आहे. माझा रोल जरी बदलला असला तरी, महाराष्ट्र तोच आहे, महाराष्ट्राच्या प्रगतीची स्वप्नही तिच आहेत. त्यामुळे ज्या रोलमध्ये असेल त्या रोलमध्ये जे प्रयत्न करता येतील ते प्रयत्न करत राहणार आहे : देवेंद्र फडणवीस
कोरोनाशी लढा, अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणणं गरजेचं, आता हातपाय गाळून परवडणार नाही. राज्य सरकारने आता महत्त्वाची पावलं उचलणं गरजेचं : देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री असताना जे व्हिजन होतं त्यात तसूभरही बदल नाही : देवेंद फडणवीस
कोरोनामुळं ज्याचं नुकसान झालं आहे, त्यांच्यासाठी पॅकेज, मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली की घोषणा- उद्योगमंत्री सुभाष देसाई
काँग्रेस हा पक्ष इतर पक्षापेक्षा वेगळा आहे. आमच्या पक्षाच लोक बोलू शकतात, तक्रार देखील करु शकतात : बाळासाहेब थोरात
आमचं सरकार आलं आणि कोरोनाचं संकट आलं. मात्र आम्ही पाच वर्षात राज्याला विकासाच्या उच्च पातळीवर घेऊन जाऊ : बाळासाहेब थोरात
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचं व्हिजन, एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात मंत्री बाळासाहेब थोरात
राम मंदिराचं भूमिपूजन धुमधडाक्यातच व्हायला हवं पण आता ती वेळ नाही. मात्र राम मंदिराचं ई-भूमिपूजन मान्य नाही : राज ठाकरे
सरकारचे निर्बंध, टेलिव्हिजनवरील बातम्या आणि व्हॉट्सअॅपवरील मेसेजमुळे लोकांमध्ये भीती : राज ठाकरे
सुरुवातीच्या काळातच लॉकडाऊन कडक करायला हवा होता : राज ठाकरे
सरकारच्या कामाची पद्धत कळत नाही. लॉकडाऊनमधून कसं बाहेर पडायचं हे माहित नाही. राज्यातील जनतेला वेठीस धरणं योग्य नाही : राज ठाकरे
लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा, अनेकांचे व्यवसाय बुडाले : राज ठाकरे
कोरोनाच्या संकटाचा कोणालाच अंदाज नव्हता : राज ठाकरे
सुरु आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं नव्या महाराष्ट्रासाठीचं व्हिजन
पार्श्वभूमी
मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर झालं आणि एक नवी आघाडी उदयास आली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार सत्तेत आलं. महाराष्ट्राल स्थिर सरकार मिळाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच महाराष्ट्राला कोरोनाने विळखा घातला. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच आहे. अशातच आता या जीवघेण्या कोरोना व्हायरसमधून महाराष्ट्राला मुक्त करण्यासाठी सरकारचं व्हिजन काय आहे? त्याचबरोबर कोरोना व्हायरसमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या परिणामांचा सरकार कसा सामना करणार आहे? तसेच सरकारला त्यांच्या कार्याची जाण करुन देणाऱ्या विरोधकांची भूमिका काय आहे? हे जाणून घेण्यासाठी एबीपी माझाचा खास उपक्रम माझा महाराष्ट्र माझं व्हिजन हा कार्यक्रम आज होणार आहे.
सध्या कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सगळं काही थांबल्यासारखं चित्र आहे. काही ठिकाणी काही गोष्टी सुरु करुन दिलासा दिला असला तरी अद्याप जनजीवन सुरळीत झालेले नाहीत. अशात महाराष्ट्रासमोर अनेक समस्या देखील उभ्या ठाकल्या आहेत. या समस्यांवर मात करत नवा महाराष्ट्र कसा घडवायचा याबाबत राज्यातील महत्वाच्या नेत्यांचं व्हिजन जाणून घेण्याचा प्रयत्न एबीपी माझाने केला आहे.
महाराष्ट्राच्या गाडीचं स्टेअरिंग कुणाच्या हाती? महाराष्ट्राची ही गाडी सुसाट धावणार का? कोरोनामुळे महाराष्ट्राची गाडी पंक्चर झाली? तीन चाकांपैकी एका चाकाकडे दुर्लक्ष झालंय? सरकारची गाडी अयोध्येचा स्टॉप घेणार का? कोरोनाला रोखण्यात सरकार कितपत यशस्वी ठरलंय? या सगळ्या संदर्भात विरोधकांची भूमिका काय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या विशेष कार्यक्रमातून आपल्याला मिळणार आहेत.
सर्वात मोठ्या मंचावर राज्यातील महत्वाचे नेते आपलं व्हिजन ठेवणार आहेत. हा कार्यक्रम आज दिवसभर एबीपी माझावर सुरु राहणार आहे. सकाळी दहा वाजता मनसे प्रमुख राज ठाकरे आपलं व्हिजन मांडतील आणि या कार्यक्रमाची सुरुवात होईल. तर 11 वाजता महसूल मंत्री आणि कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे आपलं व्हिजन मांडतील. 11.30 वाजता उद्योगमंत्री सुभाष देसाई तर दुपारी 12 वाजता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आपलं व्हिजन मांडतील.
दुपारी एक वाजता आरोग्यमंत्री राजेश टोपे आपलं व्हिजन मांडतील. सध्या कोरोनाच्या काळात आणि भविष्यात देखील कोरोना आणि आरोग्याच्या दृष्टिने त्यांचं व्हिजन काय असणार? हे फार महत्वाचं आहे. तर दुपारी दीड वाजता राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे आपलं व्हिजन मांडतील. बोगस बियाणे, खरीपाची पेरणी तसेच कृषि क्षेत्रासाठी नेमकं सरकारचं काय व्हिजन असणार आहे, यावर भुसे आपलं मत व्यक्त करतील.
दुपारी दोन वाजता मनोरंजन क्षेत्राचं व्हिजन काय असावं यावर चर्चा होईल. यात अभिनेते प्रशांत दामले, दिग्दर्शक महेश मांजरेकर, निर्माते नितीन वैद्य, संगीतकार अतुल गोगावले सहभागी होणार आहेत.
दुपारी तीन वाजता अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आपलं व्हिजन मांडणार आहेत. साडेतीन वाजता शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या शाळा नेमक्या कधी सुरु होणार? सुरु केल्या तरी त्याचं नियोजन कसं असेल? याबाबत व्हिजन मांडतील. दुपारी चार वाजता केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर हे या कार्यक्रमात सहभागी होतील. मंत्री जयंत पाटील 4.30 तर मंत्री अशोक चव्हाण पाच वाजता आपलं व्हिजन मांडतील.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सायंकाळी सात वाजता कार्यक्रमात सहभागी होऊन आपलं व्हिजन मांडणार आहेत. रात्री 8 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या कार्यक्रमात सहभागी होतील. ते नव्या महाराष्ट्रासाठी त्यांचं व्हिजन काय असणार आहे, याबाबत विचार मांडतील.
'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' हा कार्यक्रम आज सकाळी दहा वाजल्यापासून एबीपी माझावर पाहता येणार आहे. एबीपी माझाच्या अधिकृत यू-ट्यूब चॅनल, फेसबुक पेजवर नेटीझन्सना हा कार्यक्रम लाईव्ह पाहता येणार आहे.