#माझामहाराष्ट्रमाझंव्हिजन LIVE : खासदार इम्तियाज जलील महाराष्ट्राचं व्हिजन मांडताना
महाराष्ट्राच्या विकासाप्रती नव्या सरकारचं धोरण, तर विरोधकांची भूमिका काय? 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' सकाळी 10 वाजल्यापासून
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
22 Feb 2020 05:33 PM
दोन भाऊ वेगवेगळ्या कारणांनी वेगळे झाले म्हणून नातं तुटत नाही, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य
कुणीही न घेतलेली खाती मी मागून घेतली, 'नाईट लाईफ'मुळे मुंबईच्या अर्थव्यवस्थेला आणखी चालना मिळेल : आदित्य ठाकरे
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वर्षा बंगल्यावर चर्चा सुरू
सर्वसामान्यांना परवडणारी घरं उपलब्ध करून देऊ : जितेंद्र आव्हाड
शहराच्या गरजेप्रमाणे बदल होणं आवश्यक : जितेंद्र आव्हाड
देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्री म्हणून सहकार्य मिळालं : सुभाष देसाई
अनुकूल संधी शोधून मंदीतून बाहेर पडावं लागेल : सुभाष देसाई
चांगल्या कामासाठी बाळासाहेबांनी कधीच विरोध केला नाही : सुभाष देसाई
महाराष्ट्राची उद्योग वाढ होईल यासाठी प्रयत्न : सुभाष देसाई
शिवसेनेने हिंदुत्व सोडलेलं नाही : सुभाष देसाई
सीएएबाबतच्या भूमिकेवर मुख्यमंत्री ठाम : सुभाष देसाई
सीएएबाबत उद्धव ठाकरेंची भूमिका विचाराअंती : सुभाष देसाई
भाजपनं काश्मिरमध्ये विचारांना मुरड घातली : सुभाष देसाई
उद्योग, खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांच्यासोबत, काय आहे मंत्री सुभाष देसाईंचं महाराष्ट्रासाठीचं व्हिजन? पाहा लाईव्ह
माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
सुरू आहे लाईव्ह
मुख्यमंत्र्यांच्या पंतप्रधान भेटीवर टीकेचा अधिकार भाजपला नाही- बाळासाहेब थोरात
मुख्यमंत्र्यांच्या पंतप्रधान भेटीवर टीकेचा अधिकार भाजपला नाही- बाळासाहेब थोरात
राज्यातील सरकार तीन पक्षांचं आहे, हे सरकार 5 वर्ष पूर्ण करणार : शरद पवार
शेतीवरचा भार कमी करायला हवा, शेतीवरील अवलंबून लोकसंख्या कमी झाली तर शेतीक्षेत्राचा विकास होईल, विकसित देशांचं हेच सूत्र आहे : शरद पवार
महाराष्ट्रात सर्वात मोठ्या प्रमाणात पाण्याचे साठे : शरद पवार #
देशातील लोकसंख्येचा मोठा भाग शेतीवर अवलंबून : शरद पवार
राज्याचं 60व्या वर्षात आणि माझं 80व्या वर्षात पदार्पण : शरद पवार
ठिबक सिंचनाच्या वापरात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर : शरद पवार
पार्श्वभूमी
मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात संत्तांतर झालं आणि एक नवी आघाडी उदयास आली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार सत्तेत आलं. आता या सरकारचं महाराष्ट्राच्या विकासाप्रती काय व्हिजन आहे? त्याचबरोबर सरकारला त्यांच्या कार्याची जाण करुन देणाऱ्या विरोधकांची भूमिका काय आहे? हे जाणून घेण्यासाठी एबीपी माझाचा खास उपक्रम माझा महाराष्ट्र माझं व्हिजन हा कार्यक्रम आज होणार आहे.
त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सुभाष देसाई, अशोक चव्हाण, जितेंद्र आव्हाड, प्रकाश आंबेडकर, चंद्रकांत पाटील, अब्दुल सत्तार, इम्तियाज जलील आणि आदित्य ठाकरे या नेत्यांचा सहभाग असणार आहे. सकाळी १० वाजेपासून तुम्ही हा कार्यक्रम एबीपी माझावर पाहू शकणार आहात.