Majha Maharashtra Majha Vision: मुंबई : यंदाचं वर्ष निवडणूक वर्ष आहे, त्यामुळे सर्वच पक्षांनी आगामी निवडणुकांसाठी कंबर कसली असून त्यानुसार डावपेच आखण्यासही सुरुवात केली आहे. आगामी निवडणुका महाराष्ट्राची (Maharashtra News) पुढची दिशा ठरवण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आणि चुरशीच्या होणार आहेत. गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या जनतेनं अनेक राजकीय धक्के सोसले आहेत. न भूतो न भविष्यती अशा अनेक घटना राज्याच्या राजकीय वर्तुळात (Maharashtra Politics) घडला. ज्याचा परिणाम फक्त राजकीय वर्तुळात न राहता सर्वसामान्यांच्या थेट घरापर्यंत पोहोचला. 


आधी शिवसेनेतील (Shiv Sena) अंतर्गत बंडाळी, त्यापाठोपाठ शिवसेना (Balasahebanchi Shiv Sena) आणि पक्षचिन्हाचा वाद, त्यानंतर शिंदे विरुद्ध ठाकरे (Uddhav Thackeray) लढाई आणि हे वादळ शांत होतं न होतं, तोच राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) पडलेली फूड आणि थोरले पवार विरुद्ध अजित पवार असा काका पुतण्यात रंगलेल्या पक्ष आणि चिन्हासाठी रंगलेल्या वाद. अशातच हे वादळ शांत होतं, तेवढ्यात मिलिंद देवरा आणि अशोक चव्हाणांच्या रुपात महाराष्ट्र काँग्रेसला पडलेलं मोठं खिंडार. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा निवडणूक अत्यंत चुरशीची होणार यात काही शंकाच नाही. 


गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यानं पाहिलेलं अभूतपूर्व राजकीय बंड, आणि त्यानंतरचे आरोप प्रत्यारोपांच्या तोफा अद्याप थंडावलेल्या नाहीत. अशा तोफांचा सामना करतानाच राज्याच्या विकासात कसूर न करता राजकीय लढाई लढत राहणं हा समतोल सध्या सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनाही करावा लागत आहे. अशातच पुरोगामी महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांना राज्यातल्या सद्यस्थितीबाबत काय वाटतंय? अशा परिस्थितीत राज्याच्या प्रगतीची दिशा कशी असेल. महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी या नेत्यांचं व्हिजन काय असेल याबद्दल या सर्व नेत्यांशी आज दिवसभर आम्ही दिलखुलास संवाद साधणार आहोत 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' (Majha Maharashtra Majha Vision 2024) या कार्यक्रमात. 






'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन'ला राजकीय नेत्यांची मांदियाळी


'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' (Majha Maharashtra Majha Vision 2024) या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde), भाजप मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रीया सुळे (Supriya Sule) यांच्यासह राज्यातल्या प्रमुख नेत्यांशी दिलखुलास संवाद साधला जाणार आहे. आज दिवसभर एबीपी माझावर 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रीया सुळे, एमआयएमआयचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते प्रफुल्ल पटेल, ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची उपस्थिती असणार आहे.  


'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' हा कार्यक्रम आज दिवसभर एबीपी माझावर पाहता येणार आहे. एबीपी माझाच्या अधिकृत यू-ट्यूब चॅनल, फेसबुक पेज, ट्विटर हॅण्डलवर प्रेक्षकांना हा कार्यक्रम लाईव्ह पाहता येणार आहे.


'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' लाईव्ह पाहा :


एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' या कार्यक्रमात अनेक राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व राजकीय नेते महाराष्ट्रासाठीचं आपलं व्हिजन मांडणार आहेत. राज्याच्या राजकारणात गेल्या दोन  वर्षांत प्रचंड उलथा-पालथ झाली आहे. अजूनही राज्याच्या राजकारणातील नाट्यमयी घडामोडींना पूर्णविराम मिळालेला नाही. आधी शिवसेनेतील अंतर्गत फूट, त्यानंतर महाराष्ट्रानं अनुभवलेला अभूतपूर्व सत्तासंघर्ष. शिवसेनेतील प्रबळ नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड केलं आणि शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला. शिवसेनेत उभी फूट पडली.  महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर राज्यात न भुतो न भविष्यती असं सरकार सत्तेत आलं. शिंदे-फडणवीस सरकार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील शिंदे गट आणि भाजप यांच्या युतीचं सरकार. पण हे बंड शांत होतं न होतंच तोपर्यंत राष्ट्रवादीत फूट पडली आणि दोन गट समोर आले. थोरल्या पवारांचा गट आणि दुसरा अजितदादांचा गट. जेकाही शिंदे गट आणि ठाकरे गटात झालं, काहीसं तेच-तेच राज्यातील जनतेनं पुन्हा शरद पवार गट आणि अजित पवार गटात झाल्याचं अनुभवलं. त्यातही हे बंड शांत होतं न होतं, तोच महाराष्ट्र काँग्रेसला खिंडार पडलं. काँग्रेसमधील मोठं नाव मिलिंद देवरा यांनी काँग्रेसची साथ सोडली आणि शिंदेंची कास धरली. त्यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये मोठ्या थाटात प्रवेश केला. 


राज्यात सुरू असलेल्या नाट्यमयी घडामोडींचा परिणाम यंदा होणाऱ्या आगामी राज्यसभा, लोकसभा, विधानसभा निवडणुकांवर होणार आहे. आयाराम-गयारामांसोबतच पक्षांतर्गत फुटीमुळे यंदा निवडणुकीच्या रणधुमाळीतही अनेक नाट्यमयी घडामोडी पाहायला मिळणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण आणि महाराष्ट्रासाठीचं राज्याचं व्हिजन मांडण्यासाठी राजकीय नेतेमंडळी आज एबीपी माझावर येणार आहेत.