Majha Maharashtra Majha Vision: महाराष्ट्रात (Maharashtra News) सध्या बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shiv Sena) आणि भाजप (BJP) यांचं संयुक्त सरकार आहे. मात्र, असं असलं तरी गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यानं पाहिलेलं अभूतपूर्व राजकीय बंड, आणि त्यानंतरचे आरोप प्रत्यारोपांच्या तोफा अद्याप थंडावलेल्या नाहीत. अशा तोफांचा सामना करतानाच राज्याच्या विकासात कसूर न करता राजकीय लढाई लढत राहणं हा समतोल सध्या सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनाही करावा लागत आहे. अशात पुरोगामी महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांना राज्यातल्या सद्यस्थितीबाबत काय वाटतंय. अशा परिस्थितीत राज्याच्या प्रगतीची दिशा कशी असेल. महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी या नेत्यांचं व्हिजन काय असेल याबद्दल या सर्व नेत्यांशी आज दिवसभर आम्ही दिलखुलास संवाद साधणार आहोत. 


'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' (Majha Maharashtra Majha Vision) या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis), राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासह राज्यातले प्रमुख नेत्यांशी दिलखुलास संवाद साधला जाणार आहे. आज दिवसभर एबीपी माझावर 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे प्रमुख राज ठाकरे, काँग्रेस नेते अशोक चव्हाण, राष्ट्रवादी नेते जयंत पाटील, सुधीर मुनगंटीवार, उदय सामंत, संजय राऊत यांची उपस्थिती असणार आहे.  


'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' हा कार्यक्रम आज दिवसभर एबीपी माझावर पाहता येणार आहे. एबीपी माझाच्या अधिकृत यू-ट्यूब चॅनल, फेसबुक पेज, ट्विटर हॅण्डलवर प्रेक्षकांना हा कार्यक्रम लाईव्ह पाहता येणार आहे.


'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' लाईव्ह पाहा :



एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' या कार्यक्रमात अनेक राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व राजकीय नेते महाराष्ट्रासाठीचं आपलं व्हिजन मांडणार आहेत. गेल्या वर्षी महाराष्ट्रात अभूतपूर्व सत्तासंघर्ष झाला. शिवसेनेतील प्रबळ नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड केलं आणि शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला. शिवसेनेत उभी फूट पडली.  महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर राज्यात न भुतो न भविष्यती असं सरकार सत्तेत आलं. शिंदे-फडणवीस सरकार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील शिंदे गट आणि भाजप यांच्या युतीचं सरकार. 


राज्यात सध्या सत्तासंघर्षाचा पेच अनिर्णीतच आहे. सत्ता संघर्षासोबतच खरी शिवसेना कोणाची? धनुष्यबाण कोणाचं? हे मुद्देही सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहेत. याभोवतीच सध्या राज्याचं राजकण फिरतंय, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. याच पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण आणि महाराष्ट्रासाठीचं राज्याचं व्हिजन मांडण्यासाठी राजकीय नेतेमंडळी आज एबीपी माझावर येणार आहेत.