Majha Maharashtra Majha Vision 2021 LIVE: 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन'चे प्रत्येक अपडेट्स

Majha Maharashtra Majha Vision 2021 LIVE: एबीपी माझातर्फे आज 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. हा कार्यक्रम आज सकाळी 9 वाजल्यापासून एबीपी माझावर पाहता येणार आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 12 Aug 2021 09:10 AM
राजकीय फायद्यासाठी शहरांची अवस्था बिकट होत आहे - राज ठाकरे

मुंबईतील झोपडपट्ट्यांमधील अनधिकृत घरांना अधिकृत केलं जाते. राजकीय फायद्यासाठी शहरांची अवस्था बिकट होत आहे.  

रस्ते बांधणे, फ्लायओव्हर बांधणे, हातात मोबाईल येणे याला मी प्रगती म्हणणार नाही- राज ठाकरे

राज ठाकरे : रस्ते बांधणे, फ्लायओव्हर बांधणे, हातात मोबाईल येणे याला मी प्रगती म्हणणार नाही. देश म्हणून  आपण वैचारिक प्रगती केली का? देश म्हणून आपण विचार करतोय का?

रस्ते बांधणे, फ्लायओव्हर बांधणे, हातात मोबाईल येणे याला मी प्रगती म्हणणार नाही- राज ठाकरे

राज ठाकरे : रस्ते बांधणे, फ्लायओव्हर बांधणे, हातात मोबाईल येणे याला मी प्रगती म्हणणार नाही. देश म्हणून  आपण वैचारिक प्रगती केली का? देश म्हणून आपण विचार करतोय का?

रस्ते बांधणे, फ्लायओव्हर बांधणे, हातात मोबाईल येणे याला मी प्रगती म्हणणार नाही- राज ठाकरे

राज ठाकरे : रस्ते बांधणे, फ्लायओव्हर बांधणे, हातात मोबाईल येणे याला मी प्रगती म्हणणार नाही. देश म्हणून  आपण वैचारिक प्रगती केली का? देश म्हणून आपण विचार करतोय का?

रस्ते बांधणे, फ्लायओव्हर बांधणे, हातात मोबाईल येणे याला मी प्रगती म्हणणार नाही- राज ठाकरे

राज ठाकरे : रस्ते बांधणे, फ्लायओव्हर बांधणे, हातात मोबाईल येणे याला मी प्रगती म्हणणार नाही. देश म्हणून  आपण वैचारिक प्रगती केली का? देश म्हणून आपण विचार करतोय का?

रस्ते बांधणे, फ्लायओव्हर बांधणे, हातात मोबाईल येणे याला मी प्रगती म्हणणार नाही- राज ठाकरे

राज ठाकरे : रस्ते बांधणे, फ्लायओव्हर बांधणे, हातात मोबाईल येणे याला मी प्रगती म्हणणार नाही. देश म्हणून  आपण वैचारिक प्रगती केली का? देश म्हणून आपण विचार करतोय का?

सर्वच क्षेत्रात आपल्याला आत्मनिर्भर होण्याची गरज- बाबा रामदेव 

आपण जिथून प्रवास सुरु केला, शेती क्षेत्र, उद्योग क्षेत्र, आरोग्य क्षेत्र, संशोधनात आणि समाजजीवनाच्या विविध क्षेत्रात कोणतंही राष्ट्र पुढे जातं, तेव्हा गोष्ट एका तत्वाची नसते, तर समाजजीवनाच्या सर्व तत्वांचा सर्वसमावेशी, सर्वांगीण विकास होतो, असं बाबा रामदेव म्हणाले. तसेच अद्यापही अनेक गोष्टींसाठी आपण चीनवर अवलंबून आहोत. अनेक गोष्टींसाठी युरोपातील कंपन्यांवर निर्भर आहोत. त्यामुळे सर्वच क्षेत्रात आपल्याला आत्मनिर्भर होण्याची गरज आहे, असंही बाबा रामदेव यांनी स्पष्ट केलं. 

जातीपात, प्रांत, भाषा, धर्म या भेदभावातून देशाला मुक्त झालेलं पाहायचंय : बाबा रामदेव

बाबा रामदेव म्हणाले की, "मी लहानपणापासूनच या गोष्टीसाठी खूप आग्रही होतो. इंग्रजांनी आपल्या देशाची खूप लूट केली. त्यामुळे माझ्या मनात अद्यापही आक्रोश आहे. वैर नाही, पण माझ्यात एक झंझावात आहे. एक वीरता, पराक्रम, स्वाभिमानाची भाव चेतना आहे. त्यांनी आपल्यावर आक्रमणं केली. आपण राजकीय गुलामगिरीतून मुक्त झालोय, पण आर्थिक, सांस्कृतीक, वैचारिक गुलामगिरीतून भारत कधी मुक्त होणार? हा प्रश्न माझ्या मनात नेहमीच असतो. दुसरा माझ्या मनात भाव असतो की, मी लहानपणापासून पाहिलं होतं की, जातीपातीचा भेदभाव, प्रांतिय भेदभाव, भाषेत भेदभाव, मला या सर्व गोष्टींतून भारताला मुक्त झालेलं पाहायचंय."

धर्मनिरपेक्षता, समानता, सहिष्णूता, सद्भावना आणि एकात्मकेतनं आपण पुढे जाऊ : बाबा रामदेव

"आपण जिथून प्रवास सुरु केला, शेती क्षेत्र, उद्योग क्षेत्र, आरोग्य क्षेत्र, संशोधनात आणि समाजजीवनाच्या विविध क्षेत्रात कोणतंही राष्ट्र पुढे जातं, तेव्हा गोष्ट एका तत्वाची नसते, तर समाजजीवनाच्या सर्व तत्वांचा सर्वसमावेशी, सर्वांगीण विकास होतो. सर्वस्पर्शी विकास होतो. तेव्हा आपण म्हणू शकतो की, आपण आपल्या शहीदांची स्वप्न पूर्ण केली आहेत. तसेच हे पूर्ण करण्यासाठी आपण यशस्वी झालो आहोत. आपण सामाजिक, राजकीय, धार्मिक जीवनात जे आपले मूळ सिंद्धांत आहेत, ते भारतात धर्मनिरपेक्षता, समानता, सहिष्णूता, सद्भावना आणि एकात्मकेतनं आपण पुढे जाऊ. पुढे जाऊन अनेक गोष्टी करायच्या आहेत. या प्रवासाला अंत नाही.", असं योगगुरु रामदेव बाबा म्हणाले. 

जागतिकीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याची गरज, सरकारी धोरण हे खाजगी उद्योजकांना मुभा देणारं हवं :अरुण फिरोदिया

सर्वच क्षेत्रामध्ये खासगी कंपन्यांना वाव मिळाला पाहिजे. पाठबंधारे , वीज निर्मिती, रस्ते बांधकाम तसेच अनेक क्षेत्रामध्ये खासगी क्षेत्राला वाव दिला पाहिजे असं उद्योगपती अरुण फिरोदिया म्हणाले

स्वातंत्र्यापूर्वी आपण इतरांवर निर्बंध, आता बहुतेक क्षेत्रात स्वयंपूर्ण: अरुण फिरोदिया

स्वातंत्र्यापूर्वी काहीच उत्पादन नव्हते,टाचण्या, काडेपेटीही आयात करण्यात यायच्या. आता बहुतांशी निर्मिती. 
देशाने शुन्यापासून सर्व प्रगती केली असून यामध्ये सरकार आणि लोकांचं योगदान आहे उद्योगपती आणि कायनेटिक ग्रुपचे चेअरमन अरुण फिरोदिया म्हणाले. 

कुशल नेतृत्व आहे पण संघटनात्मक पातळीवर कमी पडलो: नाना पटोले

राजीव गांधींच्या नंतर संघटनात्मक पातळीवर कमी पडलो. नेतृत्व आहे राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी जीएसटी, नोटबंदी आणि कोरोना काळातील संकटावर आधीच सांगितलं होतं. देशाच्या विकासाचा अपप्रचार करण्यात आला, त्याला लोकं बळी पडले आणि त्यामुळे देशाला चुकीचे नेतृत्व मिळालं.  त्याचा परिणाम लोकांना भोगावा लागतोय. 

बेरोजगारी संपवण्यासाठी शेतीवर आधारित उद्योग उभारण्याच गरज : नाना पटोले

बेरोजगारी ही समाजाला लागलेली किड  सर्वात मोठी किड आहे. त्यामुळे आता शेतीवर आधारित उद्योग उभारण्याच गरज आहे. कृषी संदर्भात केद्र सरकारची चुकीची धोरणं शेतकरी आणि या क्षेत्राच्या विकासाला बाधा घालत असल्याचं नाना पटोले यांनी सांगितलं. त्यामुळे या क्षेत्राचा विकास करणे अत्यावश्यक असल्याचं नाना पटोले यांनी सांगितलं. 

रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणं हे कांग्रेसचं व्हिजन: नाना पटोले

रोजगाराची संधी उपलब्ध करुन देणं ही आताची सर्वात महत्वाची गोष्ट आहे. राजीव गांधींनी कॉम्पुटर सुरु केलं म्हणून त्याची फळं आज आपण चाखतोय. अशीच व्यवस्था येत्या काळात गावागावात उभी करण्याचा संकल्प काँग्रेसचा आहे. 

देशाच्या एकत्रिकरणामध्ये, लोकशाही टिकवण्यामध्ये काँग्रेसची महत्वाची भूमिका : नाना पटोले

 
देशाच्या एकत्रिकरणामध्ये, लोकशाही टिकवण्यामध्ये काँग्रेसची महत्वाची भूमिका असल्याचं महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. देशातल्या लोकांना लोकशाहीमध्ये सामिल करण्यामध्ये आणि लोकशाही बळकटीकरणामध्ये काँग्रेसने महत्वाची भूमिका बजावल्याचंही त्यांनी सांगितलं. 

सहा महिन्यात फ्लेक्सी इंजिन आणणार, पूर्णपणे इथेनॉलवर चालणारं इंजिन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं व्हिजन

Majha Maharashtra majha vision 2021 Live update : सहा महिन्यात फ्लेक्सी इंजिन आणणार, पूर्णपणे इथेनॉलवर चालणारं इंजिन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं व्हिजन... 

समृद्धी महामार्गाच्या बाजूनं मुंबई आणि पुण्याच्या धर्तीवर 25 ते 30 लाखांची नवी पाच शहरं विकसित करण्याची आवश्यकता : नितीन गडकरी

"समृद्धी महामार्गाच्या बाजूनं मुंबई आणि पुण्याच्या धर्तीवर 25 ते 30 लाखांची नवी पाच शहरं विकसित करण्याची आवश्यकता आहे. या शहरांना रेल्वे स्थानक, विमानतळं निर्माण करण्याची गरज आहे. त्याकरता अनेक चांगल्या जागा आणि लोकेशन्स आहेत. कारण आपल्याला आवडो किंवा न आवडो हळूहळू शहरीकरण होत आहे. त्यामुळे जागा उपलब्ध नाही, यामुळे अनेक नव्या समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे मुंबई, पुण्याच्या विकासाऐवजी इतर जे टू-टायर सिटी आहेत, त्याचा विकास करणं गरजेचं आहे.", असं नितीन गडकरी म्हणाले. 

पाणी प्रश्न सोडवण्यासाठी जलसंवर्धनाच्या माध्यमातून सिंचन प्रकल्प वाढवणं गरजेचं : नितीन गडकरी

"राज्यातील कळीचा मुद्दा आहे पाणी. मी जलसंपदा मंत्री होतो, त्यावेळी मी 40 हजार कोटी महाराष्ट्राला दिले. पाणी प्रश्न सोडवण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भाग, कोकणातील, विदर्भ, मराठवाड्यातील दुष्काळी भाग याठिकाणी आपल्याला सिंचनाच्या सुविधा वाढवाव्या लागतील. आज राज्यात सिंचनाचं प्रमाण 22 टक्क्यांवर आहे. पण आपल्याला जलसंवर्धनाच्या मार्गातून आणि त्याचबरोबर सिंचन प्रकल्प वाढवून राज्यातील सिंचनाचं प्रमाण 50 टक्क्यांच्या वर नेणं गरजेचं आहे. हे केल्याशिवाय ग्रामीण महाराष्ट्र सुखी-समृद्ध होणार नाही.", असं नितीन गडकरी म्हणाले. 

मुंबई-पुण्यातलं ट्रॅफिक 50 टक्के कमी करणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं व्हिजन

Majha Maharashtra majha vision 2021 Live update : मुंबई-पुण्यातलं ट्रॅफिक 50 टक्के कमी करणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं व्हिजन...



 



- 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन'चे प्रत्येक अपडेट्स 

'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन'' : दिग्गजांचं महाराष्ट्रासाठीचं व्हिजन एबीपी माझावर दिवसभर

15 ऑगस्टला आपण देशाचा पंच्याहत्तरावा स्वातंत्र्यदिन साजरा करतोय. आपल्या देशाचा देशाचा नकाशा नजेसमोर आणला लक्षात येतं की भौगोलिकदृष्टया आपल्या महाराष्ट्राचं स्थान बरोबर मध्यभागी आहे. आणि तसंच ते देशाच्या प्रगतीत सुद्धा. महाराष्ट्र मेला  तरी राष्ट्र मेले, मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले..खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा ही सेनापती बापटांची वाक्य देशातलं महाराष्ट्राचं कर्तृत्व अधोरेखित करतात. 


Nation First-Always First, राष्ट्र सर्वप्रथम, सदैव सर्वप्रथम ही यावेळच्या स्वातंत्र्यदिनाची थीम आहे. अर्थात महाराष्ट्राला हे काही वेगळं सांगण्याची गरजच पडली नाही. कारण देशाच्या इतिहासातलं कोणतंही महत्वाचं पानं असो की देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील महत्वाच्या घटना महाराष्ट्रानं सदैव देशासाठी सर्वस्व दिलंय. देशातलं सामाजिक, सांस्कृतिक-राजकीय वारं कोणत्या दिशेनं वाहतंय याचा अंदाज घ्यायला महाराष्ट्राकडे आधीही  बघितलं जायचं आणि आजही क्रांतीचा, विकासाचा, नवनिर्मितीचा वारसा घेऊन आपण पुढे जातोय. 


देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना आपला देश, आपलं राज्य आणि नागरिक म्हणून आपण किती पुढे गेलोय, भविष्यात आपल्याला काय करायचंय, आणि स्वातंत्र्याची शंभरी साजरी करताना आपण कुठे असायला हवंय याची चर्चा करण्याचा आजचा टप्पा आहे. देशपातळीवर महाराष्ट्राचं विविध क्षेत्रात नेतृत्व करणाऱ्या नेते, अभिनेते, उद्योजकांशी  दिवसभर या कार्यक्रमातून आपण संवाद साधणार आहोत. 

'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन'': आज दिवसभर एबीपी माझावर  दिग्गज नेत्यांचं व्हिजन

 राज्यातील ठाकरे सरकारला नुकतीच दोन वर्ष पूर्ण झाली. तसेच केंद्रीय मंत्रीमंडळात बरेच बदल देखील नुकतेच झाले आहेत. देशाचा स्वातंत्र्यदिन तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशात देशासह राज्यात अनेक समस्या आहेत. राज्याचं बोलायचं झालं तर मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, MPSC अशा अनेक मुद्द्यांसह, पूर, कोरोना अशी संकटं अद्याप कायम आहेत. या पार्श्वभूमिवर एबीपी माझातर्फे आज 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. 

पार्श्वभूमी

मुंबई : राज्यातील ठाकरे सरकारला नुकतीच दोन वर्ष पूर्ण झाली. तसेच केंद्रीय मंत्रीमंडळात बरेच बदल देखील नुकतेच झाले आहेत. देशाचा स्वातंत्र्यदिन तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशात देशासह राज्यात अनेक समस्या आहेत. राज्याचं बोलायचं झालं तर मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, MPSC अशा अनेक मुद्द्यांसह, पूर, कोरोना अशी संकटं अद्याप कायम आहेत. या पार्श्वभूमिवर एबीपी माझातर्फे आज 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. 


या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह मनसे प्रमुख राज ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री सुभाष देसाई या नेत्यांसह बाबा रामदेव, अभिनेते सचिन पिळगावकर, खेळाडू अंजली भागवत, उद्योजक अरुण फिरोदिया, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर या आपलं व्हिजन मांडणार आहेत.  'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' हा कार्यक्रम आज सकाळी 9 वाजल्यापासून एबीपी माझावर पाहता येणार आहे. एबीपी माझाच्या अधिकृत यू-ट्यूब चॅनल, फेसबुक पेज, ट्विटर हॅण्डल आणि हॉटस्टारवर नेटीझन्सना हा कार्यक्रम लाईव्ह पाहता येणार आहे.


15 ऑगस्टला आपण देशाचा पंच्याहत्तरावा स्वातंत्र्यदिन  साजरा करतोय.आपल्या देशाचा देशाचा नकाशा नजेसमोर आणला लक्षात येतं की भौगोलिकदृष्टया आपल्या महाराष्ट्राचं स्थान बरोबर मध्यभागी आहे. आणि तसंच ते देशाच्या प्रगतीत सुद्धा.  महाराष्ट्र मेला  तरी राष्ट्र मेले, मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले..खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा ही सेनापती बापटांची वाक्य देशातलं महाराष्ट्राचं कर्तृत्व अधोरेखित करतात. 


Nation First-Always First, राष्ट्र सर्वप्रथम, सदैव सर्वप्रथम ही यावेळच्या स्वातंत्र्यदिनाची थीम आहे. अर्थात महाराष्ट्राला हे काही वेगळं सांगण्याची गरजच पडली नाही. कारण देशाच्या इतिहासातलं कोणतंही महत्वाचं पानं असो की देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील महत्वाच्या घटना महाराष्ट्रानं सदैव देशासाठी सर्वस्व दिलंय. देशातलं सामाजिक, सांस्कृतिक-राजकीय वारं कोणत्या दिशेनं वाहतंय याचा अंदाज घ्यायला महाराष्ट्राकडे आधीही  बघितलं जायचं आणि आजही क्रांतीचा, विकासाचा, नवनिर्मितीचा वारसा घेऊन आपण पुढे जातोय. 


देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना आपला देश, आपलं राज्य आणि नागरिक म्हणून आपण किती पुढे गेलोय, भविष्यात आपल्याला काय करायचंय, आणि स्वातंत्र्याची शंभरी साजरी करताना आपण कुठे असायला हवंय याची चर्चा करण्याचा आजचा टप्पा आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.