Majha Katta With Bachchu Kadu : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत गुवाहाटीला जाणं आनंदाचे नव्हते. कारण एखाद्या बांधलेल्या घरातून जाताना दु:ख होते, असे मत आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी व्यक्त केले. माझ्या मतदारसंघातले काही प्रकल्प अपूर्ण राहिले आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या संदर्भातील, दिव्यांगाच्या संदर्भातील काही प्रश्न सुटले नसल्याचे बच्चू कडू म्हणाले. याबाबत मी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना भेटलोही होतो. हे प्रश्न सोडवण्याची उद्धव ठाकरेंची इच्छाही होती. पण त्यांच्या आजूबाजूचे जे अधिकारी होते ते कामच करत नव्हते, असेही कडू यावेळी म्हणाले. अडीच वर्षाच्या काळात दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी एकही बैठक झाली नसल्याचे ते म्हणाले. 


उद्धव ठाकरेंबद्दल आजही आस्था कायम


उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मला आजही आस्था कायम आहे. पण मातोश्रीवर ते जेवढे मजबूत आणि शोभून होते, तेवढे ते वर्षावर नव्हते, हे खर आहे. मी त्या गोष्टी अनुभवत होतो. मागच्या अडची वर्षाच्या काळात दिव्यांगांच्या प्रश्नाबाबत एकही बैठक झाली नसल्याचे कडू यावेळी म्हणाले. सत्तेत गेल्यावर काही महत्वाचे, राज्य स्तरावरचे विषय असतात, काही मतदारसंघातील विषय असतात. ते विषय पूर्ण झाले नाहीत. त्यामुळं लोक लगेच विचारत होते की, तुम्ही राज्यमंत्री आहेत तर मग प्रश्न का सुटत नाहीत असे बच्चू कडू म्हणाले. त्यामुळं या गोष्टी मला खटकत होत्या. दरम्यान, मुख्यमंत्री पदाचा कारभार नव्यानं उद्धव ठाकरे यांच्याकडे आल्यानं तो पुढे घेऊन कसं जायचं हे त्यांना माहित नव्हते. याबाबत मी त्यांना दोष देणार नाही पण, काही गोष्टी होतात असेही बच्चू कडू म्हणाले. 


एकनाथ शिंदे यांच्यामुळेच मी पाठिंबा दिला होता


एकनाथ शिंदे यांच्यामुळंचं मी महाविकास आघाडीला सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता असेही बच्चू कडू यावेळी म्हणाले. त्यांच्याशी मैत्रीचं नातं होते. त्यामुळं सुरुवातीला त्यांना नाही म्हणता आलं नाही असेही कडू यावेळी म्हणाले. दरम्यान, मतदारसंघातील काम होण्यासाठी सत्ता महत्त्वाची असते. पण सत्तेत असूनही काही प्रश्न सुटले नसल्याचे कडू यावेळी म्हणाले. मी 15 वर्ष विरोधात काम केलं. तरी मतदारसंघातील लोक मलाच मत देत असल्याचेही कडू यावेळी म्हणाले. 


मला गुवाहाटीवरुन परत यायचे होते पण....


आमचा बापजादा कोणाही राजकारणात नाही. जात पात धर्म आम्ही कधी बघितला नाही. आम्ही राजकारणात काही तत्व जपली. पण राजकारणात काही वेळा रणनिती करावी लागते. रणनिती आखताना काही तत्व बाजूला ठेवावी लागतात, त्याचे दु:ख होते असेही कडू यावेळी म्हणाले. मी गुवाहाटीला जाऊ नये असे बऱ्याच लोकांना वाटत होते, पण मी गेलो असेही कडू म्हणाले. मला तिथे गेल्यावर पाठिंबा आहे, असं सांगून परत यायचे होते पण येता नाही आले. ती वेळ अशी असते की, आलेला माणूस परत जाऊ नाही द्यायचा, असे ते म्हणाले.  


महत्त्वाच्या बातम्या:


Majha Katta : रवी राणांना पुढे करुन जर कुणी गेम करत असेल तर.... बच्चू कडूंचा थेट इशारा