Majha Katta : महापुरूषांवर फक्त टीका केली जाते. परंतु, महापुरूषांना समजून घेऊन आपण त्यांची चिकित्सा करत नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये महापुरूषांच्या बाबतीमधील काही वक्तव्य होत आहेत, असे मत ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे ( Dr. Raosaheb Kasbe) यांनी व्यक्त केले. एबीपी माझाच्या माझा कट्टा ( Majha Katta ) या कार्यक्रमात ते बोलत होते. 


गेल्या काही महिन्यांपासून राज्यात महापुरूषांबाबत सतत वादग्रस्त वक्तव्य होत आहेत. याबाबत डॉ. कसबे यांनी माझा कट्ट्यावर संवाद साधला. ते म्हणाले, महापुरूषांच्या जीवनाकडे चिकित्सक दृष्टीने बघाल आणि कुठलाही बायस दृष्टीकोन न ठेवता त्यांचा आणि त्यांच्या व्यक्तीत्वाचा अभ्यास कराल, त्यांच्या जीवन प्रेरणांचा अभ्यास कराल, त्यांच्या विचारांचा अभ्यास करा त्यावेळी तो महापूरूष नीट समजतो. सगळेच महापुरूष विनाकारण टीकेला बळी पडत आहेत. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील काही भागावर आपण टीका करतो. परंतु, महापुरूषांवर टीका करणं योग्य नाही. जोपर्यंत वैचारीक साहित्याची निर्मिती होत नाही तोपर्यंत असे वाद होत राहतील असे डॉ. कसबे यांनी म्हटले आहे. 


Majha Katta : समान नागरी कायदा फक्त मोदीच आणू शकतात


समान नागरी कायद्याची भारतात खूप आवश्यकता आहे. समान नागरी कायदा फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच आणू शकतात. त्यांनी हा कायदा आणावा, कारण काँग्रेस हा कायदा कधीच आणू शकत नाही. हा कायदा आणला तर हिंदू- आणि मुस्लिम समाजात निर्मान झालेली दरी कमी होईल, असे मत डॉ. कसबे यांनी यावेळी व्यक्त केले. 


Majha Katta : महाराष्ट्र- कर्नाटक सीमा वादावर कोणी राजकारण करू नये 


महाराष्ट्र- कर्नाटक सीमा वादावर कोणी राजकारण करू नये. सीमा भागातील लोक कन्नड बोलतात. त्यामुळे विनाकारण हा राजकीय प्रश्न बनू नये, असे मत डॉ. कसबे यांनी व्यक्त केले. 


Majha Katta : नकारात्मकता संपवण्यासाठी सर्वांनी एकमेकांसोबत प्रेमाने राहावे


समाजातील नकारात्मकता संपवण्यासाठी सर्वांनी एकमेकांसोबत प्रेमाने राहावे. नात्यांच्या गुंफणीतून प्रेम निर्माण होते. सर्व गोष्टींवर प्रेम हाच एक पर्याय आहे. माणूस हा इतर प्रमाण्यांपेक्षा समृद्ध प्राणी आहे. त्यासाठी माणसाला सर्जनशील बनवणे गरजेचे आहे, असे मत यावेळी डॉ. कसबे यांनी व्यक्त केले. 


महत्वाच्या बातम्या


American MP Shri Thanedar Majha Katta: बेळगाव ते ते मिशिगन, असा आहे अमेरिकेतील पहिले मराठी खासदार श्री ठाणेकर यांचा प्रेरणादायी प्रवास