Rohit Pawar Majha Katta : मराठा समाजाला जर 16 टक्के आरक्षण द्यायचे असेल तर आपल्याला संसदेत जावं लागले. त्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागेल, त्यानंतरच ते आरक्षण मिळेल असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलं. रोहित पवार यांनी एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर हजेरी लावली. राज्यात ज्यावेळी मराठा आरक्षणाचा मुद्दा येतो त्यावेळी नेते मोठमोठी भाषणं ठोकतात. जेव्हा संसदेत बोलण्याची संधी दिली जाते, तेव्हा कोणाही बोलत नसल्याचे रोहित पवार म्हणाले.


आश्वासने देऊन काही होत नाही, त्यासाठी चर्चा करावी लागते 


भाजपचे किती खासदारांनी केंद्रात आरक्षणाचा मुद्दा मांडला? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला. केंद्र सरकारनं याबाबत घेतलेल्या विशेष अधिवेशनात हा मुद्दा घेतला नाही. कारण केंद्र सरकारला हे करायचे नाही असे रोहित पवार म्हणाले. मनोज  जरांगे पाटील यांनी जे आंदोलन केले तिथे लाठीचार्ज झाला. ते व्हायला नको होते. त्या लाठीचार्जच्या तपासाचे काय झाले हे बघावे लागेल असे रोहित पवार म्हणाले. या आधी देखील जरांगे पाटलांनी अनेक आंदोलनं केली आहेत. त्यांना सरकारनं आश्वासने दिली आहेत. पण आश्वासने देऊन काही होत नाही, त्यासाठी चर्चा करावी लागते असे रोहित पवार म्हणाले. 


मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सरकारनं जलद पावले उचलली पाहिजेत, त्यासाठी पाठपुरवा केला पाहिजे असे रोहित पवार म्हणाले. धनगर समाजालाही एक महिन्याची मुदत दिली आहे. मराठा समाजाला दिलेली मुदत संपत आली आहे. आरक्षणाच्या मुद्यावरुन राजकारण कसे करायचे हे भाजपला चांगले माहिच असल्याचे रोहित पवार म्हणाले. शिक्षण महाग झाले आहे, युवकांना नोकऱ्या मिळत नसल्याचे  रोहित पवार. 


शिक्षण घेतलेल्या 60 टक्के युवकांना नोकरी मिळू शकत नाही


सध्या शिक्षण घेतलेल्या 60 टक्के युवकांना नोकरी मिळू शकत नाही. कारण शिक्षण व्यवस्थाच तशी असल्याचे रोहित पवार म्हणाले. याबद्दल कोण काम करणार. यावर कोणाही चर्चा करत नसल्याचे रोहित पवार म्हणाले. युवकांच्या हातालाच काम मिळणार नसतील तर युवक का रस्त्यावर उतरणार नाही असे रोहित पवार म्हणाले. आपवी संस्कृती चांगली आहे म्हणून उद्रेक होत नाही. अन्यथा उद्रेक व्हायला वेळ लागत नसल्याचे रोहित पवार म्हणाले.   


महत्त्वाच्या बातम्या:


Majha Katta : भाजपच्या काळातच महाराष्ट्राची पिछेहाट, मंत्री दिलेला शब्द पाळत नाहीत : रोहित पवार