नांदेड : एबीपी माझाने बातमी दाखवल्यावर आता राज्यातील सर्व आश्रमशाळांची पाहणी करण्यात येणार आहे. सर्पदंशाने गेल्या 15 वर्षांत राज्यातील सातशेहून अधिक मुलांचा मृत्यू झाला झाल्याची बातमी एबीपी माझाने दिली होती. बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे राज्यातील आश्रम शाळांची पाहणी करणार आहेत.

आश्रमशाळेतील मृत्यूनंतर एबीपी माझानं राज्यभरातल्या आश्रमशाळांमध्ये किती मृत्यू झालेत याचा शोध घ्यायला सुरुवात केली. सरकारनं आजवर जाहीर न केलेला अहवाल एबीपी माझाच्या हाती आला.

साप चावून, मलेरियाचे डास चावून, पाण्यात बुडून, गंभीर आजारानं 2001 पासून मार्च 2017 पर्यंत 1 हजार 595 मुलांचा मृत्यू झाला आहे. तर फक्त सर्पदंशानं 700 हून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे.

आश्रमशाळा म्हणजे विद्यार्थांचं 11 महिन्यांचं घर. 560 अनुदानित खाजगी आश्रमशाळेच्या संस्थाचालकांनी सरकारी अनुदान घेऊनही वसतिगृह बांधलेलं नाही. शौचालय, आंघोळीची जागा नाही. 529 आश्रमशाळेत मुलांना राहायला नीट जागा नाही.

संबंधित बातमी :  5 वर्षात सर्पदंशामुळे आश्रमशाळांमधील 700हून अधिक मुलांचा मृत्यू


पाहा व्हिडिओ :