Mumbai Mahim Khadi News : मुंबईत (Mumbai) एक धक्कादायक घटना घडली आहे. दोन ट्रान्सजेंडर व्यक्तीमध्ये वाद झाल्यानंतर एका 20 वर्षीय ट्रान्सजेंडर व्यक्तीने माहिमच्या खाडीत उडी ( Mahim Khadi) मारल्याची घटना घडली आहे. उडी मारण्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान,  उडी मारलेल्या वाचवण्यासाठी दुसऱ्या ट्रान्सजेंडरने देखील माहम खाडीत उडी घेतली आहे. या घटनेनंतर अग्निशामक दलाच्या मदतीने शोधकार्य सुरु झाले आहे. मिळालेल्या माहितीुसार, या दोन ट्रान्सजेंडर व्यक्तींमध्ये माहिम व बांद्रा दरम्यान असलेल्या क्रीक पुलावर (Creek Bridge between Mahim and Bandra) शाब्दिक वाद झाला होता. या वादानंतर हे कृत्य केल्याची माहिती मिळत आहे. 

Continues below advertisement

तरुणीने माहिमच्या खाडीत नेमकी का उडी घेतली? याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही

मुंबईच्या (Mumbai) माहिमच्या खाडीत ( Mahim Khadi) एका 20 वर्षीय ट्रान्सजेंडरने उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्या ट्रान्सजेंडर व्यक्तिने  देखील खाडीत उडी घेतली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. नेमकं प्रकरण काय? माहिमच्या खाडीत नेमकी का उडी घेतली? याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. दरम्यान, या घटनेनंतर लगेच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आहे. माहिमच्या खाडीत उडी घेतलेल्या तरुणीचे शोधकार्य सुरु करण्यात आलं आहे. 

दुपारी या दोन ट्रान्सजेंडर व्यक्तींमध्ये माहिम व बांद्रा दरम्यान असलेल्या क्रीक पुलावर शाब्दिक वाद झाला

आज दुपारी सुमारे 12 वाजून 20 मिनीटांनी मुंबईतील बांद्रा (पश्चिम) येथील लाल माती, नरगिस दत्त नगर येथे राहणारे दोन ट्रान्सजेंडर व्यक्ती इरशाद आसिफ शेख (वय 22) आणि कलंदर अल्ताफ खान (वय 20) यांच्यात माहिम व बांद्रा दरम्यान असलेल्या क्रीक पुलावर शाब्दिक वाद झाला होता. वादादरम्यान, इरशादने पुलावरून पाण्यात उडी घेतली. त्याला वाचवण्यासाठी कलंदर खाननेही पाण्यात उडी मारली. मात्र, दोघेही पाण्यात बुडाल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच माहिम पोलिस तसेच बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून शोधमोहीम सुरू आहे. दरम्यान, दोन ट्रान्सजेंडर व्यक्ती इरशाद आसिफ शेख आणि कलंदर अल्ताफ खान यांच्यात नेमका काय वाद झाला होता? याबाबतची माहिती अद्याप मिळू शकली नाही. खूप वेळापासून शोधकार्य सुरुच आहे. अद्यापही दोघांपैकी कोणीही सापडले नाही. 

Continues below advertisement

महत्वाच्या बातम्या:

Mumbai Rain Updates : मुंबईतील मिठी नदीत दोन तरूण बुडाले, एकाचा मृत्यू, एकाचा शोध सुरु