मुंबई : महाराष्ट्राच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असलेले भाजपचे चाणक्य अमित शाह (Amit Shah) यांची मंगळवारी महायुतीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर अद्याप 90 विधानसभा जागांवर तिढा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जागावाटपासंदर्भात महायुतीची लवकरच दिल्लीत बैठक होणार आहे. महायुतीच्या (Mahayuti) उमेदवारांची पहिली यादी नवरात्रीत येण्याची शक्यता आहे.
अमित शाहा यांनी तिढा असणाऱ्या जागांवर दोन दिवसात मिटींग करून तीन पक्षाचे नेते तोडगा काढावा अशा सूचना केल्या आहेत. उद्याच महायुतीच्या नेत्यांची पुन्हा बैठक पार पडणार आहे. विद्यमान आमदारांच्या जागा या त्या-त्या पक्षातील विद्यमान आमदारांना देण्यात येतील. तसेच जिथ भाजपाचा आमदार कमकुवत असेल अशा जागा महायुतीतील अजित पवार एनसीपी आणि एकनाथ शिंदे शिवसेना यांना प्राधान्य असेल.
महायुतीच्या नेत्यांची उद्या मुंबईत पुन्हा बैठक होणार
महायुतीच्या नेत्यांची उद्या मुंबईत पुन्हा बैठक होणार आहे. अमित शहा यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर ज्या जागांबाबत अजूनही निर्णय झालेला नाही. त्या जागांबाबत उद्या पुन्हा एकदा महायुतीच्या बैठकीत तिन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत चर्चा होणार आहे. बैठकीची वेळ अद्याप ठरलेली नाही. बैठकीला भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित राहतील.
जागावाटपासंदर्भात महायुतीची लवकरच दिल्लीत बैठक
भाजप पदाधिकाऱ्यांना जिंकण्याचा कानमंत्र दिलाय. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना फोडा आणि आपल्याकडे जोडा, असे निर्देश अमित शाहांनी दिलेत. नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये नेते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. विदर्भासाठी त्यांनी मिशन 45 चा, तर मराठवाड्यासाठी मिशन 30चा नारा दिलाय. संभाजीनगरमधल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी आपापल्या पक्षांचे सर्व्हे अमित शाह यांच्याकडे सोपवल्याची माहिती आहे. जागावाटपासंदर्भात महायुतीची लवकरच दिल्लीत बैठक होणार आहे.
10 ते 20 नोव्हेंबर दरम्यान आगामी विधानसभा निवडणूक
10 ते 20 नोव्हेंबर दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 28 नोव्हेंबरच्या आधी राज्यात नवी विधानसभा अस्तित्वात येणं, अत्यंत आवश्यक आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, मतदानाचे सर्व टप्पे संपल्यानंतर किमान एक दिवस गॅप ठेवून मतमोजणी करणं अत्यंत आवश्यक असतं. त्यामुळे हे लक्षात घेता, महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकांचे टप्पे 10 ते 20 नोव्हेंबर दरम्यान येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
हे ही वाचा: