मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज होत आहे. मात्र मित्रपक्ष महाराष्ट्र विकास आघाडीवर नाराज आहेत. मित्रपक्षांना शपथविधी सोहळ्याचं आमंत्रणच नसल्याने, कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात मित्रपक्षांना स्थान मिळालेलं नाही. शेतकरी कामगार पक्ष, बहुजन विकास आघाडी, आरपीआय कवाडे गट हे सगळे मित्रपक्ष महाविकास आघाडीवर नाराज असल्याचं कळत आहे.
शिवसेनेकडून हे नेते मंत्रिपदाची शपथ घेणार
आदित्य ठाकरे (मुंबई)
अनिल परब (मुंबई)
उदय सामंत (रत्नागिरी)
गुलाबराव पाटील (जळगाव)
दादा भुसे (मालेगाव, नाशिक)
संजय राठोड (दिग्रस, यवतमाळ)
संदीपान भुमरे (पैठण, औरंगाबाद)
शंकरराव गडाख , नेवासाचे अपक्ष आमदार (नेवासा, अहमदनगर)
अब्दुल सत्तार (राज्यमंत्री) (सिल्लोड, औरंगाबाद)
राजेंद्र पाटील यड्रावकर, अपक्ष आमदार (राज्यमंत्री) (शिरोळ, कोल्हापूर)
शंभूराज देसाई (राज्यमंत्री) (पाटण, सातारा)
बच्चू कडू, अपक्ष आमदार (राज्यमंत्री) (अचलपूर, अमरावती)
काँग्रेसमधून हे नेते शपथ घेणार
के.सी.पाडवी (धुळे) (अक्कलकुवा, नंदुरबार)
अशोक चव्हाण (नांदेड)
अमित देशमुख (लातूर)
यशोमती ठाकूर (अमरावती)
विजय वड्डेटीवार (चंद्रपूर)
सुनील केदार
अस्लम शेख (मुंबई)
वर्षा गायकवाड (मुंबई)
सतेज पाटील (राज्यमंत्री) (कोल्हापूर)
विश्वजित कदम (राज्यमंत्री) (सांगली)
राष्ट्रवादीचे हे नेते शपथ घेणार
अजित पवार (उपमुख्यमंत्री) (बारामती, पुणे)
दिलीप वळसे पाटील (आंबेगाव, पुणे)
धनंजय मुंडे (परळी, बीड)
अनिल देशमुख
डॉ. राजेंद्र शिंगणे
हसन मुश्रीफ (कागल, कोल्हापूर)
जितेंद्र आव्हाड (ठाणे)
नवाब मलिक (मुंबई)
बाळासाहेब पाटील
राजेश टोपे
प्राजक्त तनपुरे (राज्यमंत्री) (अहमदनगर)
दत्ता भरणे (राज्यमंत्री)
अदिती तटकरे (राज्यमंत्री) (रायगड)
संजय बनसोडे (राज्यमंत्री)