Mahavikas Aghadi Leader Security : महाविकास आघाडीच्या महत्वाच्या नेत्यांची सुरक्षा राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने काढली आहे. मिलिंद नार्वेकर यांची सुरक्षा मात्र वाढवण्यात आली आहे. त्याशिवाय जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षाही जैसे थे ठेवण्यात आली आहे. महत्वाच्या नेत्यांची सुरक्षा काढत शिंदे सरकारनं विरोधकांना मोठा धक्का दिला आहे. शिंदे सरकारच्या या निर्णायावर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. शिंदे सरकारच्या या निर्णायामुळे राजकारणात काही महत्वाची गणितं जमतात का? जितेंद्र आव्हाड हे गेल्या सरकारमध्ये मंत्री होते, पण एमसीएच्या निवडणुकीत त्यांना आशिष शेलार यांची साथ मिळाली होती, त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी काही गणितं जमतात का? याची चर्चा सुरु झाली आहे. मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत झालेली वाढ हाही चर्चेचा विषय आहे. नार्वेकर यांना आधी एक्स कॅटेगरीची सुरक्षा होती. आता त्यांना वाय प्लस सुरक्षा दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आणि सत्ताधारी पक्षामध्ये विविध मुद्द्यावर वाद झालेले पाहायला मिळत होते. आता महाविकास आघाडीमधील अनेक महत्वाच्या नेत्यांच्या सुरक्षा काढण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. शिंदे सरकारच्या या निर्णायामुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मागील दोन ते तीन महिन्यात शिंदे सरकारकडून महाविकास आघाडी सरकारच्या अनेक निर्णायांना स्थगिती देण्यात आली होती. यावरुन राजकीय वातावरण तापले असतानाच आता महत्वाच्या नेत्यांची सुरक्षा काढण्यात आली आहे. यामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांचा समावेश आहे.
कोणत्या नेत्यांची सुरक्षा काढली?
वरुण सरदेसाई
छगन भुजबळ
बाळासाहेब थोरात
नितीन राऊत
नाना पटोले
जयंत पाटील
सतेज पाटील
संजय राऊत
विजय वडेट्टीवार
धनंजय मुंडे
भास्कर जाधव
नवाब मलिक
नगरहरी झिरवळे
सुनील केदारे
डेलकर परिवार
विरोधी पक्षातील व्यक्ती असो अथवा सर्वसामान्य व्यक्ती असो, त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे. कुणाला सुरक्षा देणं, न देणं ही जबाबदारी सरकारची आहे. कोणताही अनुचित घटना घडू नये याची काळजी सरकारने घ्यावी. सरकारने आमची सुरक्षा कमी केली, त्याला विरोध करण्याचं आमचं कारण नाही. सरकारला वाटतेय की आम्हाला सुरक्षा द्यायची गरज नाही, तर आम्हाला काहीही अडचण नाही, असी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलो यांनी दिली. सरकारला आलेल्या रिपोर्ट्सनुसार नार्वेकरांच्या सुरक्षेत वाढ केली असेल, असेही पटोले म्हणाले.