Mahashivratri 2023 Live Updates : महाशिरात्रीनिमित्त शेगावात 12 ज्योतिर्लिंगांचे प्रदर्शन, भाविकांची मोठी गर्दी

Mahashivratri 2023 Live Updates  : आज राज्यासह देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह आहे. भगवान शंकराची कृपा लाभावी यासाठी शिवभक्त आज मनोभावे पूजा करतात.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 18 Feb 2023 05:31 PM

पार्श्वभूमी

Mahashivratri 2023 Live Updates  : आज राज्यासह देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह असणार आहे. भगवान शंकराची कृपा लाभावी यासाठी शिवभक्त मनोभावे पूजा करून यादिवशी उपवास करतात. महाशिवरात्रीचे व्रत केल्याने महादेवाच्या आशीर्वादासोबत सुख...More

Mahashivratri 2023 : शिर्डी साईप्रसादलयात भक्तांसाठी महाशिवरात्रीनिमित्त साडे पाच टन साबुदाणा खिचडीचा प्रसाद

Mahashivratri 2023 : महाशिवरात्रीनिमित्त साईबाबांच्या शिर्डीत येणाऱ्या साई भक्तांसाठी साबुदाणा खिचडी आणि झिरकचा महाप्रसाद ठेवण्यात आला आहे. आज महाशिवरात्रीनिमित्त शिर्डीच्या साईप्रसादालयात तब्बल साडेपाच हजार किलो साबुदाणा वापरून साबुदाणा खिचडी तयार करण्यात आली आहे. आषाढी एकादशी आणि महाशिवरात्र या दोन दिवशी साईप्रसादालयात साबुदाणा खिचडीचा प्रसाद देण्यात येत असतो. आज खिचडी सोबतच शेंगदाणा झिरकसुद्धा भक्तांना प्रसाद म्हणून देण्यात आला आहे. महाशिवरात्रीनिमित्त येणाऱ्या साई भक्तांना असणारा उपवास लक्षात घेता साई संस्थानाकडून ही जय्यत तयारी करण्यात आली असून आज दिवसभरात जवळपास 50 ते 60 हजार भाविक साईप्रसादाला येतील अशी शक्यता गृहीत धरून साई प्रसादालयात हा साडेपाच हजार किलोंचा साबुदाणा वापरून खिचडी तयार करण्यात आली आहे. आज साईबाबांच्या समाधीवर सुद्धा याच खिचडीचा प्रसाद दाखवण्यात येतो.