LIVE UPDATES | बांधावर नेते | राज्य सरकार किंवा केंद्र सरकार असो, शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज : खासदार संभाजीराजे

बळीराजा संकटात असतानाही अद्याप कुठल्याही मदतीची घोषणा केंद्र किंवा राज्य सरकारकडून करण्यात आलेली नाही. अशात आता राज्यातील काही नेते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 21 Oct 2020 05:09 PM
मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेण्यासाठी मी दौरा केला. परिस्थिती भयानक निर्माण झाली आहे. राज्य सरकार किंवा केंद्र सरकार असो, त्यांना लवकरात लवकर मदत करण्याची गरज आहे : खासदार संभाजीराजे
येत्या दोन दिवसांत मदतीचा निर्णय जाहीर करू, काटगावात बोलताना मुख्यमंत्र्यांच बळीराजाला आश्वासन
जे बोलतो ते मी करतो, पण करू शकत नाही, असं बोलत नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
जाता जाता पावसांन तडाखा दिला होत्याचं नव्हतं केलं : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्र्यांचा उस्मानाबाद दौरा, काटगावातील नुकसान पाहणीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लाईव्ह

आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा अतिवृष्टी पाहणीचा तिसरा दिवस. आज परभणी, हिंगोली, जालना, औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये पाहणी दौरा असणार आहे. देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांचा एकत्र पाहणी दौरा. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील आडगावच्या शिवारात शेतकऱ्यांनी दोघांसमोर टाहो फोडला
सोलापूर, उस्मानाबाद पाठोपाठ मुख्यमंत्री करणार कोकण दौरा,

कोकणातही परतीच्या पावसानं केलंय मोठं नुकसान
,
निसर्ग चक्रीवादळ आणि परतीच्या पावसानं कोकणाचं कंबरडं मोडलं,

पालकमंत्री उदय सामंत यांनी आघीच केलाय कोकणचा दौरा, मुख्यमंत्री कोकणात करणार घोषणा?
सोलापूर जिल्ह्यात पाहणी दौरा केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. सकाळी सोलापूर विमानतळावरुन उद्धव ठाकरे हे तुळजापूर तालुक्यातील काटगाव या गावात पाहणी दौरा करतील. जवळपास 10 हजार लोकसंख्या असलेल्या काटगावात मोठ्या प्रमाणात ऊस आणि सोयाबीनची लागवड केली जाते. अतिवृष्टीमुळे गावातून वाहणाऱ्या हरणी नदीला अनेक वर्षांनंतर पूर आला. या पुरात हाताशी आलेलं संपूर्ण पीक अक्षरशः वाहून गेलं आहे, उभं ऊस आडवं झालं आहे. शेतीचं अतोनात झालं असून घरांची देखील पडझड झाली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडून इथल्या ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत.
जीएसटी परताव्यासाठी केंद्रानं 1 लाख कोटींचं कर्ज काढलं, जीएसटी परतावा म्हणून केंद्र राज्याला यातूनच पैसे देणार आहे. त्यामुळे राज्याकडे पैसा येणार आहे, राज्याने मदत जाहीर करावी : देवेंद्र फडणवीस
केंद्र सरकार महाराष्ट्राला मदत करेल, केंद्राआधी राज्य काय मदत करणार ते सांगा : देवेंद्र फडणवीस
सत्ताधाऱ्यांनी संयम बाळगायचा असतो, पण सत्तेतील लोकच राजकीय स्टेटमेंट करतात : देवेंद्र फडणवीस
सरकारने लवकरात लवकर पंचनामे संपवून नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत करणं आवश्यक : देवेंद्र फडणवीस
अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालं असून आठ दिवसांनंतरही प्रशासन पोहोचलेलं नाही : देवेंद्र फडणवीस
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं : देवेंद्र फडणवीस
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची उस्मानाबादेतून पत्रकार परिषद लाईव्ह
केंद्राकडून मदत मिळणार, खुद्द पंतप्रधान मोदींचं फोनवरुन आश्वासन; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती
अजूनही संकट टळलेलं नाही, पुढिल काही दिवस धोक्याचा इशारा वेधशाळेने दिला आहे. सावधा राहा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
पंचनामे झाल्यानंतर प्रत्यक्षात मदत केल्याशिवाय राहणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा, धीर देण्यासाठी आलो : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा संवाद, पत्रकार परिषद लाईव्ह
अतिवृष्टीत मृत्यू झालेल्यांच्या कुटुबियांना 4 लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मदतीचा धनादेश कुटुंबियांकडे सुपूर्द
केंद्राने राज्याची देणी वेळेत द्यावीत, देणी दिली तर केंद्राकडून मदत मागावी लागणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळाली पाहिजे, केंद्राच्या मदतीची वाट न पाहता आधी राज्याच्या सरकारने मदत करावी : देवेंद्र फडणवीस
शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळाली पाहिजे, केंद्राच्या मदतीची वाट न पाहता आधी राज्याच्या सरकारने मदत करावी : देवेंद्र फडणवीस
शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळाली पाहिजे, केंद्राच्या मदतीची वाट न पाहता आधी राज्याच्या सरकारने मदत करावी : देवेंद्र फडणवीस
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी बैलगाडीतून जाऊन केली पूरग्रस्त भागाची पाहणी केली. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर , चिंचोली, भोसे या भागातील परतीच्या पावसामुळे नुकसान झाले आहे. पंढरपूर आणि परिसरात झालेल्या नुकसानीस प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला आहे. उजनी धरणातून सकाळी पाच हजार क्युसेक आणि सांयकाळी 2.50 लाख क्युसेक पाणी सोडल्यामुळे नदीच्या पात्रातून रात्रीत पाणी बाहेर पडले. यामुळे केळी , भाजीपाला, ऊस , मका या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जमीनी ऊस पिकासह वाहून गेल्या आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोरी नदीच्या पुलावर दाखल, पुलावरून मुख्यमंत्री नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. त्यांच्यासोबतचे अधिकारी आणि मंत्री मुख्यमंत्र्यांना तालुक्यातील नुकसानाबाबत माहिती देत आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा पाहणी दौरा! पाहणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगवी खुर्द परिसरात दाखल झाले आहेत. त्यांनी ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांच्याशी बातचित केली आहे.
सध्या पाऊस थांबला आहे, पण पुढच्या दोन दिवसात पावसाचा इशारा आहे. नुकसानभरपाई तर देऊच, मात्र सगळ्यांनी सावध राहा. मी दिलासा देण्यासाठी आलोय. काळजी घ्या, आपण सगळे सोबत आहोत, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला.
सध्या पाऊस थांबला आहे, पण पुढच्या दोन दिवसात पावसाचा इशारा आहे. नुकसानभरपाई तर देऊच, मात्र सगळ्यांनी सावध राहा. मी दिलासा देण्यासाठी आलोय. काळजी घ्या, आपण सगळे सोबत आहोत, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अक्कलकोटमध्ये पोहोचले आहेत. सोलापूर दौऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात 50 पेक्षा जास्त गाड्यांचा समावेश आहे. यामध्ये पोलिस, अॅम्ब्युलन्स, पदाधिकारी, मंत्री यांच्या अशा 50 पेक्षा जास्त गाड्या आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अक्कलकोटमध्ये पोहोचले आहेत. सोलापूर दौऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात 50 पेक्षा जास्त गाड्यांचा समावेश आहे. यामध्ये पोलिस, अॅम्ब्युलन्स, पदाधिकारी, मंत्री यांच्या अशा 50 पेक्षा जास्त गाड्या आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोलापुरात दाखल झाले आहेत. परंतु ज्या सांगवी गावातून मुख्यमंत्री आपल्या पाहणी दौऱ्याला सुरुवात करणार आहेत, त्या गावातील ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांना प्रवेशा करण्यास विरोध केला आहे. मुख्यमंत्र्यांनी बांधावर येऊन पाहणी करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोलापुरात दाखल झाले असून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.
पीक विम्यासंदर्भात शिथिलता देण्याची केंद्राकडे मागणी करणार : शरद पवार
अतिवृष्टीच्या संकटाला महाराष्ट्र तोंड देत आहे. काही जिल्ह्यांमध्ये नुकसानीचे प्रमाण अधिक आहे : शरद पवार
आजपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन दिवसीय नुकसानग्रस्त भागाच्या दौऱ्यावर जाणार असून ते आज सोलापूरला भेट देणार आहेत. राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा बसला असून पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी, ग्रामस्थ यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. दरम्यान, त्याआधी विरोधी पक्षांनी मुख्यमंत्र्यावर जोरदार टीका केली होती. त्यावर काहीही प्रतिक्रिया न देता मुख्यमंत्री सोमवारी दौऱ्यावर येत आहेत.
राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांशी सवांद साधण्यासाठी सत्ताधारी पक्षातील नेते आणि मंत्री आता थेट बांधावर जात असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांनी रविवारी पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांची विचारपूस करत प्रशासकीय अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले.
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कर्ज काढण्याशिवाय पर्याय नाही. मुख्यमंत्र्यांना भेटून कर्ज काढण्यासाठी आग्रह करणार : शरद पवार
छत्रपती संभाजीराजे यांच्या ओला दुष्काळ पाहणी दौरा दरम्यान तामलवाडी गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर भेट दिली. यावेळी पूर्ण तलाव वाहून गेला आहे, विहिरींचे कठडे तुटले आहेत तसेच फळबागा, सोयाबीन, तूर पूर्णपणे वाहून गेले आहेत. यावेळी संभाजीराजे यांनी पाहणी केली. यावेळी छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, काल पासून हा दौरा चालू आहे. ही परिस्थिती पाहून दुःखी आहे, सरकारने काहीतरी ठोस मदत द्यावी. शेतकऱ्यांनी जर आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्यास याला लोकप्रतिनिधी जबाबदार असतील. त्यांनी तात्काळ मदत करावी अशी मागणी केली आहे.
छत्रपती संभाजीराजे यांच्या ओला दुष्काळ पाहणी दौरा दरम्यान तामलवाडी गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर भेट दिली. यावेळी पूर्ण तलाव वाहून गेला आहे, विहिरींचे कठडे तुटले आहेत तसेच फळबागा, सोयाबीन, तूर पूर्णपणे वाहून गेले आहेत. यावेळी संभाजीराजे यांनी पाहणी केली. यावेळी छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, काल पासून हा दौरा चालू आहे. ही परिस्थिती पाहून दुःखी आहे, सरकारने काहीतरी ठोस मदत द्यावी. शेतकऱ्यांनी जर आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्यास याला लोकप्रतिनिधी जबाबदार असतील. त्यांनी तात्काळ मदत करावी अशी मागणी केली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील भिलखेड येथील अल्पभूधारक शेतकरी नीलकंठ लिपते यांनी आपल्या शेताच्या बांधावर लावलेल्या फ्लेक्सची चर्चा सध्या परिसरात रंगली आहे. नीलकंठ हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांची भिलखेड येथे 2 एकर शेती आहे. त्यांच्यावर बँक ऑफ महाराष्ट्र संग्रामपूर शाखेचं 2011 पासून एक लाख 48 हजाराचं कर्ज आहे. यापूर्वी त्यांनी फडणवीस सरकारच्या काळात कर्जमाफी साठी अर्ज केला होता व आताही वर्तमान ठाकरे सरकारच्या काळातील कर्जमाफी व शेतकरी सन्मान योजनेसाठी अर्ज केला होता पण दोन्ही सरकारच्या काळात त्याना कर्जमाफी झाली नाही. त्यामुळे त्यांनी उद्विग्न होऊन आपल्या शेतातील बांधावर मोठा फ्लेक्स लावलाय. त्यावर "फसवी कर्जमाफी" तसंच " या दोन्ही सरकारच्या काळात मला कर्जमाफी झालीच नाही" असा उल्लेख करून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फोटोही लावले आहेत. .या भिलखेड गावात जवळपास 60 टक्के शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच नसल्याचं गावातील शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
नांदेड: पाहणी दौरे बंद करा म्हणत शेतकऱ्यांची घोषणाबाजी, मदत पुनर्वसन मंत्र्यांचा ताफा अडवत केली घोषणाबाजी, पाहणी दौरे बंद करून तात्काळ मदत देण्याची मागणी, मुखेड तालुक्यातील सलगरा इथली घटना, मंत्र्यांना निवेदनाद्वारे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी.
पुरामुळे उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मराठवाडा दौऱ्यावर, बारामतीच्या गोविंदबाग निवासस्थानातून शरद पवार दौऱ्यावर निघाले
शरद पवार औरंगाबादला पोहोचले, पुरामुळे उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पवार मराठवाडा दौऱ्यावर

पार्श्वभूमी

शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सर्वपक्षीय नेते दौऱ्यावर


मुंबई : गेल्या चार पाच दिवसांत परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरश: हाहा:कार माजवला आहे. शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. बळीराजा संकटात असतानाही अद्याप कुठल्याही मदतीची घोषणा केंद्र किंवा राज्य सरकारकडून करण्यात आलेली नाही. अशात आता राज्यातील काही नेते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.


 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार


 


राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा बसला असून पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी, ग्रामस्थ यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोमवारी सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. दरम्यान, त्याआधी विरोधी पक्षांनी मुख्यमंत्र्यावर जोरदार टीका केली होती. त्यावर काहीही प्रतिक्रिया न देता मुख्यमंत्री सोमवारी दौऱ्यावर येत आहेत. गेल्या चार पाच दिवसांत परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरश: हाहा:कार माजवला आहे. बळीराजा संकटात असतानाही अद्याप कुठल्याही मदतीची घोषणा केंद्र किंवा राज्य सरकारकडून करण्यात आलेली नाही. अशात आता राज्यातील काही नेते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेत. दुसरीकडे मुख्यमंत्री ठाकरे हे मात्र घराबाहेर पडत नसल्याने भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. कोरोना काळात देखील मुख्यमंत्री ठाकरे घराबाहेर पडलेले नाहीत. त्यामुळं सातत्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.


 


शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळेंचा दौरा
मराठवाड्यातील शेतकरी ओल्या दुष्काळाच्या झळा सोसतोय. या पार्श्वभूमीवर शरद पवार आजपासून दोन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. तर आज सकाळी सात वाजल्यापासून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती व इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांची पाहणी करत आहेत.अजित पवारांच्या दौऱ्याच्या पाठोपाठ सुप्रिया सुळे यांनी देखील बारामतीच्या नुकसानग्रस्त भागांचा पाहणी दौरा सुरू केला आहे. काल सकाळी दहा वाजल्यापासून ते बारामती तालुक्यातील कर्हावागज यानंतर जळगाव क.प. येथील नुसकानग्रस्त भागाची पाहणी करून ते जेजुरी त्यानंतर पुरंदर, हवेली या भागांची पाहणी करणार आहेत. सुप्रिया सुळे यांनी इंदापूर तालुक्यातील विविध भागांचा दौरा करून दौंड तालुक्यातील ही नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली होती. त्यानंतर आज त्या बारामती पुरंदर आणि हवेली या गावांच्या दौऱ्यावर आहेत.


 


अतिवृष्टी भागात तीन दिवस देवेंद्र फडणवीस करणार दौरा
शेतकर्‍याला दिलासा देण्यासाठी आणि झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे  19 ऑक्टोबरपासून 3 दिवसांचा दौरा करणार आहेत. 19 ला ते बारामतीपासून आपला दौरा प्रारंभ करतील. कुरकुंभ, इंदापूर, टेंभूर्णी, करमाळा, परंडा इत्यादी ठिकाणी दौरा करून ते उस्मानाबादकडे रवाना होतील. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांच्या प्रवासानंतर दुसर्‍या दिवशी, 20 रोजी उस्मानाबाद, लातूर, बीड आणि परभणी या जिल्ह्यातील ठिकाणांना ते भेटी देणार आहेत. तिसर्‍या दिवशी  21 रोजी हिंगोली, जालना, औरंगाबादचा ते दौरा करतील.


 


उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख काल दुपारी 1 वाजता जिल्ह्यात दाखल झाले. राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या येणेगूर या गावांच्या शिवारातल्या महामार्गालगतच्या शेताची त्यांनी पाहणी केली.


 


 परतीच्या पावसाचा फटका


 


अन्नदात्याला पूर्णपणे वार्‍यावर सोडून दिल्यासारखी अवस्था राज्यात आहे. कोकणात धान, मराठवाड्यात सोयाबीन, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात सोयाबीन, कपाशी, ज्वारी, धान अशा पिकांना मोठा फटका बसला आहे.  रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, लातूर, उस्मानाबाद, बीड, जालना, तसेच विदर्भात सुद्धा अनेक जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, परभणी, जालना, नांदेडमध्ये सोयाबीन पीकांना कोंब फुटली आहेत. तर सोलापूर, उस्मानाबादमध्ये तर काही ठिकाणी सोयाबीनच्या गंजी वाहून गेल्याचं दिसलं. अहमदनगर जिल्ह्यात खरिपाचे सोयाबीन, मूग, उडीद, बाजरी काढणीला आले असताना परतीच्या पावसाचा फटका बसला आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.