maharastra congress on Pm Modi : कोरोना (Corona) पसरवण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस (Congress ) जबाबदार असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात आता राज्यभरात काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज राज्यभरातील भाजपच्या (BJP) कार्यालयांसमोर काँग्रेस आंदोलन करत आहे. नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसबाबत केलेल्या वक्तव्यावर माफी मागितली पाहिजे, अशी मागणी या आंदोलनातून करण्यात येत आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आंदोलन करण्यात आलं.
"मजुरांना मदत करणे हा गुन्हा असेल तर, तो गुन्हा काँग्रेसने केला आहे. राज्याच्या अस्मितेला धक्का पोहोचवण्याचं काम नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. त्यांनी माफी मागावी अशी मागणी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आंदोलनातून केली आहे. दरम्यान, काँग्रेसच्या आंदोलनाला जशास तसे उत्तर देऊ अशी भूमिका भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. त्यामुळे आंदोलनापूर्वीच आज भाजपच्या अमरावती येथील कार्यालयासमोर भाजपचे कार्यकर्ते जमले होते.
काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी?
भारताने कोरोनाच्या संकटावर मात केली आहे. परंतु, कोरोना महामारीमध्येही विरोधकांनी राजकारण केलं आहे. देशभरात कोरोना पसरवण्यास महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार आहे. कोरोना महामारीच्या काळात महाराष्ट्र काँग्रेसने मजुरांना स्थंलातर करायला लावले. परप्रांतियांना तिकिटं काढून देऊन स्थलांतर करण्यास भाग पाडले, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केला होता.
"कोरोना काळात जागतिक आरोग्य संघटनेनं सर्वांनी जिथं आहात तिथंच थांबा, असं म्हटलं होतं. पण काँग्रेसनं यूपी-बिहारच्या मजुरांना मुंबईतून बाहेर जाण्यासाठी उकसवलं. कोरोना लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने मुंबईतील परप्रांतीय मजुरांना रेल्वेची मोफत तिकीटे काढून दिली आणि महाराष्ट्रावरील बोजा कमी करण्याचं आवाहन केलं. राज्यातील काँग्रेस कार्यकर्ते स्टेशन बाहेर उभे राहून स्थलांतरीत मजुरांना राज्याबाहेर पाठवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं सांगून त्यांनी काँग्रेसनेच देशभरात कोरोना पसरवल्याचा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला होता.
Pune : पंतप्रधानाच्या वक्तव्याविरोधात आंदोलन,महाराष्ट्रबाबत वक्तव्याचा विरोध : ABP Majha
महत्वाच्या बातम्या
देशभरात कोरोना पसरवण्यास महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार, पंतप्रधान नरेंद्र मोदींची टीका
PM Modi : पंतप्रधान मोदी यांनी मानले शरद पवारांचे आभार, म्हणाले...
PM Modi in Rajyasabha : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राज्यसभेतही विरोधकांवर निशाणा, जाणून घ्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे