Maharashtra Political Crisis : मंत्री एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) मनधरणी करणारे आमदार रविंद्र फाटकच (Ravindra Phatak) आता शिंदेंच्या गटात दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय असलेले फाटक विधान परिषदेचे आमदार आहेत. विशेष फाटक हे मंगळवारी मिलिंद नार्वेकर यांच्यासमवेत शिंदेंची मनधरणी करण्यासाठी सूरतला गेले होते.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या गटात शिवसेना आणि अपक्ष मिळून 42 आमदार सामिल झाल्याचं स्पष्ट झालंय. गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये शिंदे समर्थकांचं फोटोसेशन झालं. त्याचा व्हीडिओ एबीपी माझाला मिळालाय. समर्थक आमदारांच्या या व्हीडिओतून शिंदे यांनी शक्तिप्रदर्शन केलंय. या बैठकीत विधिमंडळ नेतेपदी म्हणून एकनाथ शिंदेंची निवड करण्यात आली. त्यामुळं एकनाथ शिंदे आपला गट हीच खरी शिवसेना असल्याचा दावा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे.
एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतच्या सर्व बंडखोर आमदारांचा व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओमध्ये शिंदेंनी भाजप पाठीशी असल्याचं स्पष्ट म्हंटलंय. भाजप काहीही कमी पडू देणार नाही असं शिंदे आमदारांना सांगत आहेत. एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी सूरत येथे पाठवलं होतं. मात्र ही चर्चा निष्फळ ठरल्यानं रविंद्र फाटक आणि मिलिंद नार्वेकर यांना रिकाम्या हाती परत यावं लागलं होतं हे अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं होतं. मिलिंद नार्वेकर आणि आमदार रविंद्र फाटक हे दोन्ही एकनाथ शिंदे यांच्या जवळचे मानले जात असल्यानं या दोघांना एकनाथ शिंदे यांच्या मनधरणीसाठी पाठवलं गेलं होतं. आता मात्र ज्यांना मनधरणी करायला पाठवलं त्यांनीच उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केल्याचं चित्र पाहायला मिळाल्याने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसल्याचं समोर आलं आहे.
संबंधित बातम्या :
- एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीची तयारी मागील 6 महिन्यांपासून, गृहखात्याकडून मुख्यमंत्र्यांना माहिती दिल्यानंतरही दुर्लक्ष : सूत्र
- Maharashtra Political Crisis : मुख्यमंत्र्यांची भावनिक साद, शिंदे मात्र ठाम; राज्यात सत्ता पेच, दोन दिवसांत काय-काय घडलं?
- राजकीय संकट घोंघावतंय...SID कडून सरकारला दोन महिन्यांपूर्वीच बंडखोरीची कल्पना