Maharashtra Wether Update : राज्यात उष्णतेची लाट कायम असून अनेक दिवसांपासून तापमानाचा पारा चढताच आहे. काल (3 एप्रिल) राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर नोंदवण्यात आलं होतं. अशातच राज्यात उष्णतेची लाट असताना पुढील 4 ते 5 दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशातच गडगडाटासह जोरदार वारे वाहण्याचा अंदाजही हवामान खात्यानं वर्तवला आहे. हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ट्वीट करुन याबाबतची माहिती दिली.


हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, "पुढील 4-5 दिवसांत महाराष्ट्रात काही ठिकाणी गडगडाटासह जोरदार वारे आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. चंद्रपूर, गडचिरोली, पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग आणि कोकणात पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे." 



महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम! 


राज्यात उष्णतेची लाट कायम असून अनेक दिवसांपासून तापमानाचा पारा चढताच आहे. राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसच्यावर नोंदवण्यात आलं. तर काही जिल्ह्यात तापमानाचा पारा चाळिशीच्या उंबरठ्यावर होता. सर्वात जास्त तापमानाची नोंद अकोला (44 अंश सेल्सिअस) आणि त्यानंतर मालेगाव, चंद्रपूर (43 अंश सेल्सिअस) इथे झाली. हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ट्वीट करुन याबाबतची माहिती दिली. विदर्भातील गडचिरोली वगळता अकोला, अमरावती, बुलढाणा, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या सर्व जिल्ह्यांमध्ये 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे.  


येत्या 24 तासांत 'या' राज्यात उष्णतेचा प्रकोप


सध्या देशात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. उन्हाचा चटका वाढल्यानं नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.  या एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून, बहुतांशी भागात तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे गेला आहे. दिल्लीपासून ते उत्तर प्रदेश, बिहार, तामिळनाडू, केरळ आणि काही राज्यांत उष्णतेने थैमान घातले आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेशसह हिमाचल आणि झारखंडमध्ये येत्या 24 तासांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभाग (IMD) च्या मते, एप्रिल महिन्यात कडक उन्हाचा अंदाज वर्तवला जात आहे. IMD ने तीव्र उष्णतेचा इशारा दिला आहे. दिल्लीत आज कमाल तापमान 39 आणि किमान तापमान 19 अंशांवर नोंदवले जाऊ शकते. त्यामुळे राजधानीत सुद्दा उन्हाच्या चांगल्याच झळा लागत आहेत. त्यामुळे नागरिकांना उन्हाचा त्रास होत आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Weather Update : उष्णतेचा प्रकोप, येत्या 24 तासात देशातील 'या' भागात येणार उष्णतेची लाट