Maharashtra Rain Live Updates : राज्यात रिमझिम पावसाची हजेरी, पावसासंदर्भातील प्रत्येक अपडेट्स वाचा एका क्लिकवर..

Maharashtra Rain Live : मुंबईसह परिसरात पहाटेपासून रिमझिम पावसानं हजेरी लावली आहे. तर राज्यात पावसानं काही ठिकाणी उघडीप दिली आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 29 Aug 2022 12:05 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Weather Updates : आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पहाटेच पावसानं हजेरी लावली. मुंबईसह राज्यात पहाटे हलक्या पावसाच्या सरी पाहायला मिळाल्या. तर काही भागांमुळे पहाटे जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. मुंबई आणि ठाण्यातही काही...More

सप्टेंबरपासूनच सुरु मान्सूनचा परतीचा प्रवास

गेल्या वर्षी रेंगाळलेला मान्सून (Monsoon) यावर्षी मात्र 15 दिवस आधीच निरोप घेण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच मान्सून परतीचा प्रवास सुरु करेल असं हवामान विभागानं म्हटलं आहे. एरवी मान्सूनचा परतीचा प्रवास 17 सप्टेंबरपासून सुरु होतो आणि 30 सप्टेंबरपर्यंत मान्सून निरोप घेतो. मात्र, यावर्षी 15 दिवस आधीच मान्सून निरोप घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.