Maharashtra weather update: राज्यातील अंतर्गत भागांमध्ये वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 6 ते 9 ऑगस्ट 2025 या कालावधीत मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसाची शक्यता असून, आज राज्यात बहुतांश भागांत हवामान विभागाने हाय अलर्ट जारी केले आहे .
राज्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे . प्रशासनाने आणि नागरिकांनी सतर्कतेचा अलर्ट दिला असून शेतकऱ्यांनी हवामान बदल लक्षात घेऊन तातडीचे निर्णय घेण्याची गरज वर्तवलीय .
मराठवाड्यात पुढील 2 दिवस पावसाची शक्यता
प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार 06 ऑगस्ट रोजी हिंगोली, नांदेड, परभणी, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 07 ऑगस्ट रोजी बीड, परभणी, हिंगोली जिल्हयात तर दिनांक 08 ऑगस्ट रोजी नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, परभणी, हिंगोली जिल्हयात तर दिनांक 09 ऑगस्ट रोजी नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर लातूरमध्ये पावसाची जोरदार हजेरी..
मागील अनेक दिवसांपासून पावसानं अक्षरशः विश्रांती घेतली होती. काही ठिकाणी किरकोळ सरी बरसल्या होत्या, पण समाधानकारक पावसाने पाठ फिरवलेलीच होती. मात्र आज लातूर शहरासह लातूर ग्रामीण आणि रेनापूर तालुक्यात अनेक ठिकाणी २० ते ३० मिनिटांचा जोरदार पाऊस कोसळला. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. मागील काही दिवसांपासून केवळ हलक्याफुलक्या सरी कोसळत होत्या, पण त्याचा फारसा उपयोग शेतीसाठी होत नव्हता.
आजच्या जोरदार सरींमुळे शेती थोडा दिलासा मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. विशेषतः पेरण्या झाल्यानंतर मोठ्या पावसाची सातत्याने अपेक्षा होती तो पाऊस होत नव्हता.. काही दिवसाच्या फरकान असा पाऊस पडला तर तो पाऊस शेतीला पूरक ठरेल...
कुठे कोणता अलर्ट?
६ ऑगस्ट : रत्नागिरी, सिंधुदुर्ग,रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली ७ ऑगस्ट: रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा, वर्धा
८ ऑगस्ट : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा, वर्धा, अमरावती, अकोला
९ ऑगस्ट - रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली