पुणे: राज्यात थंडीचा कडाका वाढू लागला आहे. काही ठिकाणी तापमान ४.५ ते ५ अंशावरती पोहोचलं आहे. तर पुढील काही दिवस थंडीची लाट (Maharashtra Weather Update) कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. कोरडे हवामान, कडाक्याची थंडी आणि धुके असे चित्र सध्या दिसून येत आहे. आज राज्यात नगर परिषदेसाठीची मदतान प्रक्रिया पार पडत आहे, थंडीचा काहीसा (Maharashtra Weather Update) परिणाम मतदारांवर देखील पडल्याचं दिसून आलं. तर नाशिक आणि निफाडमध्ये तापमानाचा पारा घसरला असून नाशिककरांना थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. या मोसमातील नीच्चांकी तापमानाची नोंद आज झाली आहे. नाशिकमध्ये 6.9 अंश तर निफाडमध्ये 4.5 अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे.(Maharashtra Weather Update)

Continues below advertisement

Maharashtra Weather Update: बाळापूर शहरावर धुक्याची चादर

अकोला जिल्ह्यातील बाळापूरमध्ये आज दाट धुक्याची चादर पहायला मिळालीय. बाळापूर शहराचा आजचा पारा 10 अंशांखाली उतरलाय. शहरातील मन आणि महेशा या दोन्ही नद्यांवर धुक्यांची दाट चादर पसरली आहे. या धुक्यामुळे दृश्यमानता काही प्रमाणात कमी झाल्याचं दिसून येत आहे. बाळापूरकरांनी ऐन मतदानाच्या दिवशी या आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेतला आहे.(Maharashtra Weather Update)

तर मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि कोकण किनारपट्टीवर गारठा कायम आहे. पुणे परिसरात थंडीची लाट निर्माण झाल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 8.3 अंशांपर्यंत पारा घसरला आहे. आज हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच तापमानातील घट कायम राहण्याची शक्यता असून कमाल तापमान 29 आणि किमान 8 अंशांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. पाषाण परिसरात 8 अंश, लोहगाव 13 अंश, चिंचवड 14 अंश, मगरपट्टा 15 अंश आणि कोरेगाव पार्क परिसरात किमान तापमान 13 अंश सेल्सिअसपर्यंत राहील.

Continues below advertisement

दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 48 तासांत कमाल तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर कोणतेही मोठे बदल जाणवणार नाहीत. तर किमान तापमानात देखील पुढील 7 दिवस सध्याचीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी.