Maharashtra Weather Update: भारताच्या पश्चिम हिमालयीन प्रदेशात आणि लगतच्या मैदानी भागात पश्चिमी झंझावाताचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. परिणामी राज्यात 26 ते 28 डिसेंबरदरम्यान जोरदार पावसाची शक्यता असून ढगांच्या गडगडाटासह गारपीट होण्याचीही शक्यता हवामान विभागानं वर्तवली. या हवामान बदलाचा रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पिकांचे रक्षण करण्यासाठी योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.


सध्या पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रीय असून राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुफान पावसासह गारपीट होण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार,भारताच्या पश्चिम हिमालयीन प्रदेश आणि लगतच्या मैदानी भागात 26 डिसेंबर 2024 पासून सक्रिय पाश्चात्य झंझावाताचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. या झंझावाताची मध्य भारतातील पूर्वेकडील वाऱ्यांशी परस्परसंवाद होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातून मोठ्या प्रमाणावर आर्दता निर्माण झाल्याने हा पाऊस होईल.


कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट?


26 डिसेंबर 


धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर 


27 डिसेंबर 


धुळे ,नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, अकोला,अमरावती, बुलढाणा, वर्धा, वाशिम 


28 डिसेंबर 


जळगाव, नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अमरावती गोंदिया, नागपूर




तापमानाचा पारा वाढणार


राज्यात तापमानाचा पारा येत्या दोन दिवसांनी हळुहळु वाढणार असून 2-4 अंशांनी किमान तापमान वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.मध्य आणि पश्चिम भारतात येत्या 24 तासांत तापमानवाढीला सुरुवात होणार आहे. राज्यात 26 आणि 27 डिसेंबरला जोरदार पावसाची शक्यता असून पावसाची तीव्रता मध्य, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात राहणार असल्याचं हवामान विभागानं वर्तवलंय.दरम्यान, हवामान विभागानं काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्टही दिलाय.हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 26-28 डिसेंबरदरम्यान जोरदार पावसाची शक्यता आहे. 27 डिसेंबरला वादळी पावसासह गारपीटीची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून किमान तापमान वाढलं आहे. कडाक्याची थंडी कमी झाली असून येत्या काही दिवसात किमान तापमानात 2-4 अंश सेल्सियसने वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वर्षाची सांगता वादळी पावसानं होणार असल्याचं हवामान खात्याच्या अंदाजावरून दिसतंय.


हेही वाचा:


वादळी वाऱ्यासह गारपीटही! वर्षाच्या शेवटी राज्यात पावसाचा धुमाकुळ, वाचा IMDचा अंदाज