Maharashtra weather update: राज्यात तापमानाचा पारा प्रचंड वाढलाय . एकीकडे हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टी होत आहे . त्यामुळे पहाटे हलकासा गारवा जाणवतोय .मात्र ,सकाळी साधारण 10 वाजल्यापासूनच उन्हाचा चटका बसत असल्याने नागरिक हैरण आहेत .कोकणपट्ट्यात प्रचंड उष्ण आणि दमट हवामानाची नोंद होत असून उर्वरित महाराष्ट्रात शुष्क व कोरडे हवामान आहे .
मराठवाडा आणि विदर्भात तापमानाचा पारा चढाच राहणार असून मध्य महाराष्ट्र ही तापलाय .सोमवारी ( 3 मार्च) चंद्रपुरात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली .38.2 अंश सेल्सिअस एवढे कमाल तापमान नोंदवण्यात आले .भंडारा यवतमाळ अकोला 37° वर होते .मध्य महाराष्ट्रात पुणे 36.2 सातारा 36.1 सांगली 37.2 सोलापूर 37.9 अंश सेल्सिअस होते .मुंबईत 32.8 अंश सेल्सिअसची नोंद झाली . 3 मार्चला राज्यातील या शहरांमध्ये सर्वाधिक तापमानांची नोंद झाल्याचं हवामान तज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी x माध्यमावर पोस्ट करत सांगितलं .
राज्यात कसे राहणार हवामान ?
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार,येत्या पाच दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमानात फारसा बदल नाही .किमान तापमानात दोन ते तीन अंश घट होण्याची शक्यता आहे .हळूहळू कमाल तापमान ही 2 ते 3 अंशांनी येत्या चार दिवसात घसरणार आहे .
मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात सामान्यहून अधिक तापमान
मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात सामान्य तापमानाहून अधिक तापमानाची नोंद होत आहे. बहुतांश ठिकाणी 35-38 अंश सेल्सियसची नोंद होतेय. हवामान विभागाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांनातीव्र तापमानाचे इशारे पुढील दोन दिवस दिले आहेत .उष्ण आणि दमट वातावरणाचे यलो अलर्ट या दोन जिल्ह्यांना आहेत येत्या काही दिवसात तापमानात काहीशी घट होणार असल्याचं सांगण्यात आलंय. काहीसा दिलासा मिळणार असल्याचं दिसत असलं तरी तापमानाचा पारा चढाच राहणार असल्याने नागरिकांनी उन्हापासून संरक्षण करण्यासाठी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन तज्ञांनी केले आहे.
हेही वाचा: