Maharashtra Weather : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (climate Change) होत आहे. कुठं उन्हाचा तडाका सुरु आहे, तर कुठं ढगाळ वातावरण असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, सध्या राज्यात कोणत्याही प्रकारे अवकाळी पावसाची (Rain) शक्यता नसल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikrav Khule) म्हणाले. दरम्यान, राज्यात कुठे पावसाची शक्यता नसली तरी काही भागात वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. 


शेतकऱ्यांनी भीती बाळगू नये


दरम्यान, सध्या कांदा काढणी, कांदा साठवणीसोबतच आंबा, द्राक्षे, डाळिंब, संत्रा इत्यादी फळबागांची काढणी सुरु आहे. काही जण पॅकिंगच्या तयारीत आहेत. तर दुसरीकडे भरड धान्यांची खळ्यावर धामधूम शेतकरी करत आहेत. मात्र, सोशल मीडियावर अवकाळीच्या बातम्यांचा सध्या रोज भडीमार सुरु आहे. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण होते. मात्र, शेतकऱ्यांनी भीती बाळगू नये असं माणिकराव खुळे म्हणालेत. सध्या कोणत्याही प्रकारचे अवकाळी पावसाची शक्यता नाही. मात्र, काही ठिकाणई ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज कायम आहे.


गुढीपाडव्यानंतर काही ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता 


आठवड्यात म्हणजे गुढीपाडवा झाल्यानंतर दोन दिवसांनी रामनवमीपर्यंत, मुंबईसह कोकण वगळता खान्देश, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात तसेच मराठवाडा, विदर्भातील फक्त काही भागात केवळ ढगाळ वातावरण राहून किंचित तुरळक ठिकाणी अगदीच किरकोळ पावसाची शक्यता जाणवत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी घाबरु नये. शिवाय अजून तीन आठवडे हातात असून शक्य असल्यास शेतकऱ्यांनी शेतकामाचे त्या पद्धतीने नियोजन करता येऊ शकते. गुढीपाडव्यानंतर जरी पावसाची शक्यता असली तरी मोठा पाऊस पडणार नाही. किरकोळ पावाची शक्यता आहे. 


28 ते रविवार 31 मार्च दरम्यान काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार


दरम्यान, 28 ते रविवार 31 मार्च दरम्यानच्या चार दिवसापैकी (रंगपंचमी व नाथषट्ठी) फक्त एक-दोन दिवस विदर्भ मराठवाड्यात केवळ ढगाळ वातावरणाची शक्यता जाणवेल असे माणिकराव खुळे म्हणाले. 26 मार्चला रात्री नवीन पश्चिमी झंजावात, अतिउत्तर भारतातील पश्चिमी हिमालयीन राज्यात प्रवेशणार असून तिथं पाऊस, बर्फवृष्टी आणि थंडी जाणवणार आहे. परिणामी महाराष्ट्रातही मुंबईसह कोकण व मध्य महाराष्ट्रातील कमाल किमान तापमान सरासरी इतकी तर काही ठिकाणी सरासरीच्या खाली सध्या अजूनही जाणवत आहे. एल-निनोच्या वर्षात दोन्हीही तापमाने लाभदायक राहून महाराष्ट्रातील रब्बी पिकांना मदत होईल. 


महत्वाच्या बातम्या:


Vidarbha Weather Update: विदर्भात वाढल्या उन्हाच्या झळा! बहुतांश जिल्ह्यात पारा 35 अंशाच्या वर; कुठं किती तापमानाची नोंद?