मुंबई: बंगालच्या उपसागरामध्ये अतितीव्र कमी दाब क्षेत्राचे रविवारी रात्री चक्रीवादळामध्ये रूपांतर झाले आहे. या चक्रीवादळाचे 'मोंथा' (Maharashtra Weather update montha cyclone) असे नाव देण्यात आले असून, त्याच्या प्रभावाने विदर्भात आजपासून पुढचे दिवस २८, २९ व ३० ऑक्टोबर या दिवशी जोरदार पावसाची शक्यता (Maharashtra Weather update montha cyclone) वर्तवण्यात आली आहे. अरबी समुद्रातील तीव्र दाबाच्या क्षेत्रामुळे गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार असे तीन दिवस कोकण किनारपट्टीसह पालघर आणि मुंबईत वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. ५ नोव्हेंबरनंतर हळूहळू थंडी वाढायला सुरू होईल, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तविला आहे.(Maharashtra Weather update montha cyclone) 

Continues below advertisement

montha cyclone: मोंथा चक्रीवादळ कुठे धडकणार ?

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे ‘मोंथा’ या चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. हे चक्रीवादळ आज (मंगळवार, दि. २८) आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणून बुधवारी आणि गुरुवारी विदर्भात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हे चक्रीवादळ छत्तीसगडच्या दिशेने सरकणार असल्याने मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात याचा विशेष परिणाम होणार नाही. दरम्यान, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तीव्र दाबाच्या क्षेत्राने दिशाबदल केला असून, ते आता उत्तर-पूर्वेकडे सरकत आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र गुरुवारी रात्री दक्षिण गुजरातच्या परिसरात, विशेषतः सुरतजवळ धडकण्याची शक्यता आहे. या प्रणालीच्या परिणामामुळे उत्तर कोकणात गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या हवामानातील बदलामुळे किनारपट्टी भागातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी.

montha cyclone: या राज्यातील प्रशासन सतर्क

 तर नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर व मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात मध्यम पावसाची शक्यता आहे. त्यानंतर वातावरण निवळेल, अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे, यांनी दिली आहे. मोंथा वादळाच्या परिणामी कर्नाटक, केरळ, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि प. बंगालमध्ये मुसळधार वादळी पाऊस होण्याची शक्यता पाहता राज्यांतील प्रशासन सतर्क झाले आहे.

Continues below advertisement

montha cyclone: विदर्भात ऑरेंज अलर्ट, कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज

२९ ऑक्टोबर रोजी विदर्भात अतिमुसळधार ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. महाराष्ट्राच्या शेजारील राज्यांमध्ये चक्रीवादळाच्या प्रभावामुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.दरम्यान, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर ३० ऑक्टोबर रोजी पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात पावसाची परिस्थिती कायम राहणार आहे. गुजरातमध्येही मुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने तेथे ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हवामान तज्ज्ञांनी नागरिकांना पुढील दोन दिवस सतर्क राहण्याचे आणि आवश्यक तेथे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आवाहन केले आहे.