Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. राज्यातील काही भागात थंडीचा कडाका वाढत आहे, तर कुठे ढगाळ वातावरण जाणवत आहे. तर काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे, मागील आठवड्यातच राज्यात अवकाळी पावसाचा जोर पाहायला मिळाला होता, त्यानंतर पावसाने उघडीप दिली. हवामान विभागाच्या माहितीनुसार, शनिवारी, 17 फेब्रुवारीला एक पश्चिमी थंड वाऱ्याचा प्रवाह हिमालयीन भागात सक्रिय होण्याचा अंदाज आहे. त्याचा परिणाम म्हणून विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे राहील. 


 


 


फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत मुंबईत थंडी कायम


मागील आठवड्यात राज्यात काही ठिकाणी पाऊस, काही ठिकाणी ऊन तर काही ठिकाणी थंडी नागरिक अनुभवताना दिसले. मुंबईत मात्र मागील आठवड्यात पारा हा खाली घसरला होता, ज्यामुळे पुढील काही दिवस तापमानात कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गेल्या काही दिवसापासूंन गुलाबी थंडी अनुभवायला मिळत होती. फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत मुंबईत थंडी कायम राहील अशी देखील शक्यता वर्तवण्यात आली.


 






 


राज्यात काही ठिकाणी उन्हाळ्याची सुरूवात?


सध्याच्या घडीला राज्याच्या विदर्भ आणि मराठवाडा भागातून अवकाळीचं सावटही ओसरलं असून, या भागांमध्ये असणाऱ्या ढगाळ वातावरणानंही माघार घेतली आहे. थोडक्यात राज्यात आता उन्हाळ्याच्या दिवसांची सुरुवात झाली आहे. पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रामध्ये दुपारच्या वेळी उष्णतेचा दाह अधिक जाणवत आहे. राज्याच्या कमाल तापमानात होणारी वाढ पाहता फेब्रुवारीपासूनच यंदाच्य़ा उन्हाळ्याची सुरुवात झाली आहे हे स्पष्ट होत आहे.


 


पुढील काही दिवस पुण्यातील वातावरण कसं असेल?


14 फेब्रुवारी- आकाश निरभ राहण्याची शक्यता
15 फेब्रुवारी- आकाश निरभ्र राहण्याची शक्यता
16 फेब्रुवारी- आकाश निरभ राहण्याची शक्यता
17 फेब्रुवारी- आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता
18 फेब्रुवारी- आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता
19फेब्रुवारी- आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता 


 


हेही वाचा>>>


Weather Update : राज्यात विदर्भ, मराठवाड्यात पुढील 2 दिवस पावसाची शक्यता, तुमच्या भागातील हवामान जाणून घ्या