Maharashtra weather update: राज्यात कमाल आणि किमान तापमानात वाढ होत असल्याचे दिसून येते आहे. गेल्या चार दिवसांपासून कमाल तापमान 35 अंश ओलांडत असल्याची नोंद होत असताना गेल्या 24 तासात महाराष्ट्रात किमान तापमानातही 0-2 अंशाने वाढ झाल्याचे सांगण्यात आले. येत्या दोन दिवसात पुन्हा एकदा किमान तापमान (Temperature) 2-3 अंशांनी कमी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलाय. हवामान विभागाने दिलेला अंदाजानुसार, सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती गुजरात आणि आजूबाजूच्या परिसरात सक्रिय आहे. तर उत्तरेकडील राज्यांमध्ये दाट धुक्याची चादर राहणार असल्याचं सांगितलं गेलं. ( IMD Forecast)
महाराष्ट्रात हवामानाचा अंदाज काय?
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्य तापमानात चढउतार जाणवत आहे. किमान व कमाल तापमानात बहुतांश ठिकाणी वाढ झाली आहे.प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या 4 दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात किमान तापमानात उन्हाचा चटका अधिक जाणवणार असून उकाडा जाणवण्यास सुरुवात होणार आहे. येत्या दोन दिवसात 2-3 अंशांनी तापमान खाली येईल. त्यानंतर पुन्हा 2-3 अंशांनी वाढ होऊन नंतर तापमान हळूहळू कमी होणार असल्याचं सांगण्यात आलंय. येत्या 3 दिवसात विदर्भात फारसा बदल नसेल . पण त्यानंतर 2-3 अंशांनी घसरणार आहे. बहुतांश ठिकाणी कोरडे आणि शुष्क तापमान राहणार आहे.(Maharashtra Weather)राज्यात किमान आणि कमाल तापमान वाढले असून, उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानुसार, पुढील काही दिवस उन्हाचा प्रभाव जाणवेल, त्यामुळे नागरिकांनी योग्य काळजी घ्यावी.
कुठे कसा होता पारा?
राज्यात उन्हाचा चटका तीव्र होत असून, तापमान वाढीचा प्रभाव स्पष्ट जाणवत आहे. सोमवारी (दि. 3)सोलापूर आणि वाशीम येथे कमाल तापमान 34.4 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. तसेच, जेऊर, अकोला, ब्रह्मपुरी, वर्धा आणि यवतमाळमध्येही पारा 35 अंशांवर पोहोचला होता. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आजपासून किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. मात्र, दिवसाच्या उन्हाचा तीव्रतेवर फारसा परिणाम होणार नाही.
फेब्रुवारीत उन्हाचा चटका वाढणार
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या हवामान अहवालानुसार, देशभरात फेब्रुवारी महिन्यापासून किमान आणि कमाल तापमान सरासरीहून अधिक राहणार असल्याचं सांगण्यात आलंय. मुंबई, किनारपट्टी व उत्तर व मध्य महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढणार असला तरी उत्तर महाराष्ट्रात चार ते पाच दिवस तीव्र थंडी राहण्याची स्थिती आहे. सध्या प्रशांत महासागरात ला नीना स्थिती सक्रीय असून मध्य व पूर्व भागात तापमान सामान्य तापमानाच्या खाली आहे. म्हणजेच कमजोर आहे. एप्रिलच्या शेवटी ला नीना सक्रीय होऊन तो पुन्हा तटस्थ होणार आहे. असं हवामान विभागानं वर्तवलंय.
हेही वाचा
फेब्रुवारीपासूनच उन्हाचा चटका वाढणार, IMD चा तापमानवाढीचा इशारा, थंडी कितपत राहणार? वाचा सविस्तर