Maharashtra Weather Update : आजही राज्यात थंडीचा कडाका (Cold Weather) कायम आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात तापमान (Temperature)  हे 15 अंशाच्या खाली घसरलं आहे. त्यामुळं थंडी वाढली आहे. उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा अधिक घसरला आहे. त्याचबरोबर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील कडाक्याची थंडी पसरली आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. मुंबईतही थंडी कायम आहे. 


वाढत्या थंडीचा पिकांवर परिणाम


राज्यात काही जिल्ह्यात सातत्यानं थंडीचा जोर वाढत आहे. वाढत्या थंडीमुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. वाढत्या थंडीचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. महाराष्ट्राबरोबरचं उत्तर भारतात देखील थंडीचा कडाका वाढला आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर बर्फाची चादर पसरली आहे. त्यामुळ वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी पाणी गोठलं आहे. त्यामुळं नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागतोय. दरम्यान या वाढत्या थंडीचा पिकांवर देखील परिणाम होताना दिसत आहे. राज्यातील कापूस, हरभरा तसेच केळी पिकांवर वाढत्या थंडीचा मोठा परिणाम होत असल्याचे दिसत आहे.


पाहुयात कुठे किती तापमान? 
(अंश सेल्सिअसमध्ये) 


मुंबई - 15.5
सोलापूर - 15.6 
सातारा - 12
रत्नागिरी - 16.2 
जळगाव - 10.8 
नांदेड - 16.4 
कुलाबा - 18.2 
कोल्हापूर - 16.6 
उदगीर - 16
नाशिक - 10.5 
औरंगाबाद - 9.7 
महाबळेश्वर -13.4 
पुणे - 10.5
डहाणू - 14.4 
बारामती - 11.6
परभणी - 15
मालेगाव - 14.2 
उस्मानाबाद - 14.4 
सांगली - 14.8 
नागपूर - 14 
अकोला - 15
अमरावती - 15.1
बुलढाणा - 14
यवतमाळ - 15.5
गोंदिया - 13.5
वर्धा - 14.5


उत्तर भारतातही थंडीचा जोर मात्र, या तारखेपासून पावसाची शक्यता


उत्तर भारतातही थंडी वाढली आहे. राजधानी दिल्लीतही थंडीचा कडाका कायम आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, 21 ते 25 जानेवारी दरम्यान सक्रिय वेस्टर्न डिस्टर्बन्सचा वायव्य भारतावर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळं 21 तारखेला पहाटे पश्चिम हिमालयीन भागात पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. ही स्थिती  23 आणि 25 जानेवारीपर्यंत आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय 23 आणि 25 जानेवारी रोजी पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि उत्तर राजस्थानसह उत्तर-पश्चिम भारताच्या मैदानी भागात पावसाची शक्यता आहे. यासोबतच ताशी 50 किमी वेगाने वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळं नागरिकांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Ladakh Weather : जम्मू काश्मीरमध्ये नदी नाले गोठले, जनजीवन विस्कळीत; लडाखमध्ये उणे 29.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद