Maharashtra Weather Update: राज्यात उद्यापासून ठिकठिकाणी अवकाळी पावसाचे इशारे देण्यात आले आहेत. दरम्यान, दुसरीकडे चैत्र महिन्याला सुरुवात झाली असून बहुतांश ठिकाणी चांगलीच रखरख वाढली आहे. तापमानाचा उच्चांक नोंदवला जात असून आज गुढीपाडव्यादिवशी विदर्भसाह मध्य महाराष्ट्र, कोकण व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तापमान चांगलंच वाढलंय. विदर्भात गेल्या तीन दिवसांपासून प्रचंड तापमानाची नोंद होतेय. तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे आहे. आज चंद्रपुर जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली असून 42.2 अंश सेल्सियस तापमान नोंदवण्यात आले. (IMD)
हवामान विभागाने आज दक्षिण मध्य महाराष्ट्रासह तळकोकणातील काही जिल्ह्यांना हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज कुठेही यलो अलर्ट नसला तरी उद्यापासून अवकाळी पावसाची शक्यता पूर्वेकडील जिल्ह्यांना आहे. व त्यानंतर पावसाचा अंदाज बहुतांश महाराष्ट्रात देण्यात आलाय. आज बीड, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे.
तुमच्या शहरात कमाल तापमानाचा पारा किती?
पालघर - 33.1°C, मुंबई उपनगर - 36.3°C, मुंबई शहर - 34.5°C, ठाणे - 36.2°C, रायगड - माहिती नाही, रत्नागिरी - माहिती नाही, सिंधुदुर्ग - माहिती नाही, नाशिक - 37.8°C, धुळे - माहिती नाही, नंदुरबार - 40.3°C, जळगाव - 39.0°C, अहमदनगर - 38.2°C, पुणे - 37.8°C, सातारा - 37.8°C, सांगली - 37.4°C, कोल्हापूर - 37.8°C, सोलापूर - 41.4°C, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) - 38.4°C, बीड - माहिती नाही, जालना - माहिती नाही, परभणी - 39.8°C, हिंगोली - माहिती नाही, लातूर - 38.5°C, उस्मानाबाद - 38.4°C, नांदेड - माहिती नाही, बुलढाणा - 37.2°C, अकोला - 41.4°C, वाशीम - 39.8°C, अमरावती - 40.4°C, यवतमाळ - 40.2°C, वर्धा - 41.0°C, नागपूर - 40.6°C, चंद्रपूर - 42.0°C (सर्वाधिक तापमान), गडचिरोली - 41.2°C, गोंदिया - 38.6°C.
कोणत्या जिल्ह्याला कधीपासून पावसाचा इशारा?
31 मार्च: ठाणे, पालघर, नाशिक, नगर, धुळे, नंदुरबार, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना यलो अलर्ट.
रायगड, रत्नागिरी, पुणे, सोलापूर, बीड, छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव येथे पावसाची शक्यता.
1 एप्रिल: ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नाशिक, नगर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, बुलढाणा, अकोला, वाशीम आणि अमरावती या जिल्ह्यांना यलो अलर्ट.
पालघर, सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यांना पावसाचा इशारा.
2 एप्रिल: संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची शक्यता. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात यलो अलर्ट जारी.
हेही वाचा: