PM Narendra Modi नागपूर :  राज्याच्या उपराजधानी नागपुरात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांच्या हस्ते माधव नेत्रालयाच्या नवीन इमारतीचापायाभरणी सोहळा संपन्न होत आहे. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच पंतप्रधानांनी यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवाकार्याचा आणि स्वयंसेवकांच्या योगदानाचे तोंड वरून कौतुक केलंय. तसेच स्मृति मंदिरात डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींना वंदन करण्याचा भाग्य लाभलं, दीक्षाभूमी येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धांनाही वंदन करण्याचे भाग्य मला लाभले असल्याचेही ते म्हणाले. पंतप्रधानांच्या या भाषणातील दहा प्रमुख मुद्दे जाणून घेऊया. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गौरवशाली वर्षपूर्ती सोहळा- नरेंद्र मोदी

आगामी काळात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. सोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गौरवशाली वर्षपूर्ती सोहळा देखील साजरा केला जात आहे. संघाच्या गौरवशाली आणि सेवाभाव परंपरेच्या शंभराव्या वर्षाला सुरुवात झाली आहे.  याच काळात आपण आपल्या भारतीय संविधानाच्या 75 वर्षपूर्तीचा सोहळा ही साजरा केला. संघसेवेच्या या पवित्र भूमीत आज आपण एका पुण्य कार्य करतो आहे.  माधव नेत्रालय एक असे संस्थान आहे जे जे गेल्या अनेक वर्षांपासून आदरणीय गुरुजींच्या विचारांवर कार्य करत लाखो लोकांची सेवा करत आहे.  लोकांना नवी दृष्टी देत आहे.

गरिबांची मुलंही डॉक्टर व्हावी यासाठी मातृभाषेतून वैद्यकीय शिक्षण- नरेंद्र मोदी

दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून मी सर्वांच्या सेवाभावावर भाष्य केलं होतं. आज आरोग्य क्षेत्रात ज्याप्रमाणे कार्य होत आहे तेच कार्य माधव नेत्रालयाच्या माध्यमातून वाढवल्या जात आहे. देशात गरिबातल्या गरीब मुलांना देखील उत्तम शिक्षण मिळावं ही आमची प्राथमिक उद्दिष्टे आहे. सर्वांना चांगल्या आरोग्य सेवा मिळाल्या पाहिजे, तसेच गरिबांची मुलंही डॉक्टर व्हावी यासाठी मातृभाषेतून वैद्यकीय शिक्षण मिळावं, हे आमचे उद्दिष्ट असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

देशावर अनेक आक्रमणे, तरीही भारतीय चेतना कधीही संपली नाही- नरेंद्र मोदी

कुठल्याही राष्ट्राचे अस्तित्व हे त्या देशातील पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या त्यांच्या संस्कृतीच्या विस्तारावर अवलंबित असते. आपण आपल्या देशाचा इतिहास बघितला तर लक्षात येईल की शेकडो वर्ष गुलाम, इतके आक्रमक, भारतीय सामाजिक संरचनेला बिघडवण्याचे अनेक प्रयत्न झाले.मात्र भारतीय चेतना कधीही संपली नाही. कठीण आतल्या कठीण परिस्थितीतही ही चेतना जिवंत ठेवण्याचे कार्य झालं आहे.  भक्ती आंदोलन हे त्याचेच एक उदाहरण आहे. 

नौदलाच्या ध्वजावरील गुलामीचे चिन्ह जाऊन शिवरायांचे प्रतीक - नरेंद्र मोदी

भारत देश गुलामगिरीची मानसिकता सोडून पुढे मार्गक्रमण करत आहे.  गुलामगिरीची अस्तित्व मिटवून टाकण्यात येतं आहे. भारतीय न्याय संहिता लागू करण्यात आली आहे. लोकतंत्र्याच्या अंगणात राजपत नाही तर कर्तव्यपथ आहे. भारतीय नौदलाच्या झेंड्यातही  गुलामीचे छापण्यात आलं होतं. त्या ऐवजी आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे  प्रतीक झळकत आहे. 

वसुदेव कुटुंबकम मंत्र जगाच्या कानाकोपऱ्यात  

जगात कुठेही नैसर्गिक आपत्ती असो, अथवा  जगावर संकट काळात करुणा महामारीची वॅक्सिन पुरवण असो, देश सेवा कार्यासाठी उभा राहतो. म्यानमार मध्ये भूकंप आला असता तिथे  ऑपरेशन ब्रह्मा राबवून लोकांच्या मदतीसाठी भारत सर्वप्रथम उपस्थित होता. त्यात मदतीसाठी भारत कायम अग्रस्थानी राहिला आहे असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले

देशासाठी 2025 ते 2047 चा काळ महत्वाचा

संघाची एवढ्या वर्षांची तपश्चर्या विकसित भारताची व्याख्या लिहित आहे. जेव्हा संघाची स्थापना झाली, तेव्हा तो संघर्षाचा काळ होता. स्वातंत्र्य मिळवण्याचा आव्हान आपल्या समोर होतं. आज जेव्हा संघ शंभर वर्ष पूर्ण करत आहे तेव्हा पुन्हा आपल्यासमोर मोठे लक्ष्य आहेत. त्यामुळे 2025  ते 2047 चा काळ महत्वाचा आहे.मी अयोध्यात बोललो होतो आपल्याला पुढील एक हजार वर्षांचे लक्ष्य निर्धारित करून काम कराययचे आहे. आपण आपल्या देशाचे स्वप्न साकार करू. असेह पंतप्रधान मोदी म्हणाले. 

संघ भारताच्या राष्ट्रीय संस्कृतीचा कधीही न अक्षय वट- पंतप्रधान

राष्ट्रीय स्वंयसेवक संघ भारताच्या राष्ट्रीय संस्कृतीचा कधीही न अक्षय वट आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही असाच एक अविरत चालणारा यज्ञ आहे. जो बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करत आहे. बाह्यदृष्टी म्हणजे माधव नेत्रालय सारखे उपक्रम आहे. तर आंतरिक दृष्टी म्हणजे संघ सेवा कार्याचा पर्याय बनला आहे. हे सेवा संस्कार, ही साधना प्रत्येक स्वयंसेवकाचा प्राणवायू आहे. प्रत्येक स्वयंसेवक पिढी दर पिढी याच्यातून प्रेरित होत आहे. त्याला निरंतर गतिमान ठेवते. त्यामुळे स्वंयसेवक कधीही थकत नाही, थांबत नाही. असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

स्वंयसेवक अनुशासित सैनिकासारखे, सेवा भावनेतून काम करतात 

आपण पाहतो, डोंगराळ क्षेत्र असो, सागरी क्षेत्र असो, वनक्षेत्र असो, संघाचे स्वयंसेवक त्यांचे काम करत असतात. प्रयागराजमध्ये आपण पाहिले स्वयंसेवकांनी कशा पद्धतीने लाखो लोकांची मदत केली. जिथे सेवा कार्य तिथे स्वंयसेवक. नैसर्गिक आपत्ती असो, किंवा इतर कुठलेही संकट असो, स्वंयसेवक अनुशासित सैनिकासारखं तिथे पोहोचतात आणि सेवा भावनेतून काम करतात.

हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींनी राष्ट्रीय चेतना वाढविली

स्वातंत्र्यपूर्वी केशव हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींनी राष्ट्रीय चेतना वाढविली. शंभर वर्षापूर्वी जे वटवृक्ष निर्माण झाले होते, ते आज विशाल स्वरूपात सर्वांसमोर आहे. ते केवळ आदर्श आणि सिद्धांतामुळे हे वटवृक्ष टिकले आहे. 

हे ही वाचा