Aaditya Thackeray : उद्धव साहेबांनी (Uddhav thackeray) जर राजीनामा दिला नसता तर ते इतर राजकारण्यांसारखे झाले असते. त्यामुळं त्यांच्या मनाला जे पटलं ते त्यांनी केलं असं वक्तव्य युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केलं. उद्धव साहेब खुर्चीला चिटकून बसले नाहीत आणि त्यांनी पहाटेची शपथविधीही घेतली नाही असा टोलाही त्यांनी लगावला. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर आदित्य ठाकरेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
राज्यपाल आपल्या देशात गरजेचे आहेत का?
सुप्रीम कोर्टात दोन्ही निकाल राज्यपाल महोदय यांच्या विरोधात आहेत. लोकशाहीत राज्यपालांचे काम काय? राज्यपाल यांच्यामार्फत आपण हुकूमशाहीकडे चाललो आहे का? राज्यपाल आपल्या देशात गरजेचे आहेत का? असा प्रश्न देखील आदित्य ठाकरेंनी यावेळी केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यातील पहिली म्हणजे राज्यपाल यांची वागणूक चुकीची होती. ते एका पक्षाची व्यक्ती म्हणून काम करत होते राज्यपाल म्हणून नाही. दुसरी गोष्ट म्हणजे स्पीकरची निवडणूक ही देखील चुकीची होती. तसेच व्हीपची झालेली निवड ही देखील चुकीची होती असं आदित्य ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायलाच पाहिजे
सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे बघून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायलाच पाहिजे. राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे जा असे आदित्य ठाकरे म्हणाले. मोठे मोठे प्रकल्प राज्याच्या बाहेर गेले आहेत आणि हे खुर्चीला चिटकून बसल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. विधानसभा अध्यक्षांचा रोल खूप महत्त्वाचा आहे. घटनेत लिहिलेला आहे तो निकाल अध्यक्ष देतील. विधानसभा अध्यक्ष हे कुठल्या पक्षाचे नसतात ते सभागृहाचे अध्यक्ष असतात अस आदित्य ठाकरे म्हणाले.
विधानसभा अध्यक्षांनी संविधानाचे मित्र व्हावं
सध्या लोकशाहीला आणि संविधानाला धोका आहे. आपल्या देशात लोकशाही राहिली आहे की नाही? हा प्रश्न राहिला आहे. 40 गद्दार हे अपात्र होणार असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. अध्यक्षांनी पक्षपात न करता निपक्षपणे काम केलं तर लवकर निकाल दिसेल असेही ते म्हणाले. एकेकाळी राहुल नार्वेकर हे माझे मित्र होते. पण आता त्यांनी संविधानाचे मित्र व्हावे असेही ते म्हणाले. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी नैतिकता पाळून राजीनामा द्यावा. हुकूमशाही पद्धतीने दिल्ली पुढे महाराष्ट्राला झुकवण्याचं काम झालं आहे.
महत्त्वाच्या बातम्या: