Maharashtra Weather : राज्यातील वातावरणात (Maharashtra Weather) सातत्यानं बदल होत आहे. कुठं ढगाळ वातावरण जाणवत आहे, तर कुटं उन्हाचा तडाखा आहे. दरम्यान उद्यापासून म्हणजे 24 मार्चपासून महाराष्ट्रातील अवकाळी पावसाचे (unseasonal rain) वातावरण निवळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळं रब्बी पीक काढणी दरम्यानचा अवकाळी पावसापासूनचा नुकसाणीचा धोका टळू शकतो, अशी माहिती ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी दिली आहे. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील तापमानात वाढ होण्याची शक्यता असल्याचे खुळेम्हणाले. 


सध्याचं राज्यातील तापमान 


मागील आठवडयात तीन ते चास दिवस एकाकी झालेल्या दिवसाच्या कमाल तापमान वाढीतून उष्णतेमुळे कांदा गहू सारख्या रब्बी पिकावर विपरित परिणाम जाणवला आहे. परंतू अवकाळीच्या या वातावरणामुळे लगेचच 2 ते 3 डिग्रीने घसरलेल्या कमाल व किमान तापमानामुळे पिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सध्या दिवसाचे कमाल तापमान, कोकणात 30 ते 32 तर उर्वरित महाराष्ट्रात 36 डिग्री दरम्यान आहे. तर किमान तापमान हे  18-20 डिग्री दरम्यान जाणवत आहे. ही दोन्हीही तापमाने सरासरी इतक्याच श्रेणीत आहे. 


कमाल तापमानात वाढीची शक्यता


कमाल तापमानात वाढीची शक्यता जरी वर्तवली जात असली तरी पुढील 10 ते 12 दिवस म्हणजे गुढीपाडवा व त्यानंतरही 2 ते 3 दिवस म्हणजे साधारण बुधवार दिनांक 2 एप्रिलपर्यन्त कमाल व किमान तापमाने ही महाराष्ट्रात सरासरीच्या खाली असण्याची शक्यता जाणवते. त्यामुळे पिकांना मदतच होईल, असे वाटते.  शिवाय उभ्या असलेल्या रब्बी पिकांचा, गत 60 ते 65 दिवसाचा अवकाळी व गारपिटीचा धोक्याचा काळही निभावला आहे. दरम्यान, वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पिकांची योग्य ती काळजी घ्यावी.


एप्रिलच्या पहिल्या आठवडयात अवकाळी पाऊस पडणार?


कमकुवत ‘ला-निना’ व तटस्थ ‘आयओडी’ ह्या स्थितित जरी सध्या काहीही  बदल जाणवत नसला तरी ‘एमजेओ’ ची सायकल, एप्रिलच्या पहिल्या आठवडयात, भारत महासागरीय परीक्षेत्रात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळं त्याच्या परिणामातून काय वातावरणीय बदल घडून येतील हे त्याचवेळी लघुपल्ल्याच्या अंदाजात कळून येईल. मार्चअखेरीस ह्याचाही  खुलासा होवू शकतो असे वाटते. दरम्यान, सध्या राज्यातील अनेक भागात तापमानात मोठी वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक जिल्ह्यात तापमानाच्या पाऱ्यानं 40 अंशाचा पल्ला गाठला आहे. याचा मोठा फटका शेती पिकांना देखील बसत आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Maharashtra Weather Update:उष्णतेची लाट विरली;आता विदर्भात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट