Maharashtra Weather : राज्याच्या विविध भागात वातावरणात बदल (Climate change) होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सध्या कुठं उन्हाचा जोरदार तडाखा पाहायला मिळत आहे, तर कुठं अवकाळी पाऊस, गोरपीट होताना दिसत आहे. दरम्यान, आज राज्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. जालन्यासह, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यात पाऊस झाला आहे. यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. गारपीट झाल्यामुळं शेतकऱ्यांची पिकं वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जालना शहरासह जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट
जालना शहरासह जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. ग्रामीण भागात जोरदार अवकाळी पावसाला सुरुवात.झाली आहे. बदनापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा शेती पिकांना तडाखा बसला आहे. मात्र, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. जालना आणि बदनापूर तालुक्यात वादळी वाऱ्या सह जोरदार गारपीट झाली आहे. हवामान खात्याकडून अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली जात होती. मात्र अचानक आलेल्या या वादळी पाऊस आणि गारपीटीने पिकांचे नुकसान झाल्याची शक्यता आहे.
बुलढाण्यात गारपिटीमुळं काही प्रमाणात उन्हाळी पिकांचे नुकसान
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. वादळी वाऱ्यामुळं लोणार तालुक्यातील बिबी येथील लग्न समारंभात मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली. बिबी परिसरात झालेल्या गारपिटीमुळं काही प्रमाणात उन्हाळी पिकांचे नुकसान झालं आहे.
वाशिम जिल्ह्यात अनेक भागात गारपीटीसह पावसाची हजेरी
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज वाशिम जिल्ह्यात अनेक भागात हलक्या मध्यम स्वरूपाच्या गारपिटीसह पावसाने हजेरी लावली आहे. अवकाळी पावसामुळं आंबा पिकासह भाजीपाला आणि फळबागांचे मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसामुळं शेतीचं नुकसान
गोंदिया जिल्ह्यात आठवड्याभरापासून अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात घरांचे आणि शेतीचे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेक लोकांच्या घरांचे छप्पर उडाले आहे. गोंदिया विधानसभा क्षेत्राचे भाजप आमदार विनोद अग्रवाल यांनी आज थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेती पिकांची पाहणी केली. तर ज्या गावात लोकांच्या घरांचे छत उडाली अशा घरांची पाहणी करत लवकरात लवकर पंचनामे करण्याचे निर्देश दिले. तर नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या:.