Maharashtra Rain Update : आठवडाभराच्या विश्रांतीनंतर गोंदियात रात्रीपासून दमदार पावसाची हजेरी

Maharashtra Rain Live updates : हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या काही भागात हलक्या पावसानं हजेरी लावली आहे.

abp majha web team Last Updated: 03 Aug 2023 11:17 AM

पार्श्वभूमी

Maharashtra Rain Live Updates: राज्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात आजपासून (23 जून) पाऊस (Rain) पडण्याची शक्यता हवामान विभागानं (IMD) वर्तवली आहे. आजपासून कोकणासह मध्य महाराष्ट्रात पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज...More

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील अनेक गावांमध्ये पावसाची हजेरी

साक्री तालुक्यातील पिंपळनेर सह परिसरामध्ये वरून राजाने पाठ फिरवली होती मात्र गेल्या काही दिवसांपासून पिंपळनेर सह परिसरातील अनेक गावांमध्ये पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली असून यामुळे या भागातील धरण क्षेत्रात पाणी वाढले असून साक्री तालुक्यातील अतिशय महत्त्वाचा समजला जाणारा पांझरा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला आहे....


जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने विविध जलप्रकल्पांमधील जलसाठा घटला असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे मात्र पश्चिम पट्ट्यात पाऊस होऊ लागला असून यामुळे लाटीपाडा धरण सांडव्यावरून ओसंडून वाहू लागला आहे, गेल्या वर्षी 12 जुलै रोजी लाटीपाडा धरण पूर्ण क्षमतेने भरले होते मात्र यंदा तब्बल 20 ते 22 दिवस उशिरा हे धरण पूर्ण क्षमतेने भरले असून लाटीपाडा धरण ओव्हर फ्लो होऊन वाहू लागल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये समाधान पसरले आहे....