Maharashtra Weather News : राज्यातील वातावरणात सातत्याने बदल (Climate Change) होत आहे. कुठं पाऊस (Rain) तर कुठं उघडीप झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागात पावसानं उघडीप दिल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, पुढील आठवडाभर राज्यात नेमकं कसं असेल हवामान याबाबतची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिली आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये 13 सप्टेंबरपर्यंत चांगले सूर्यप्रकाशाचे दर्शन होणार आहे. त्यानंतर 14 ते 18 सप्टेंबर दरम्यान जोरदार पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव डख यांनी वर्तवली आहे.
पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा
पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर, लातूर, नांदेड, परभणी, बीड, हिंगोली, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये 13 ते 18 सप्टेंबर दरम्यान अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज पंजाबराव डखांनी वर्तवला आहे. यामुळे नद्यांच्या पातळीत वाढ, धरणांमधून पाणी सोडणे आणि पूरयुक्त परिस्थिती निर्माण होऊ शकते. सोयाबीन आणि उडीद यांची कापणी तसेच नवीन ज्वारीची पेरणी करताना याकडे लक्ष द्यावे.
मराठवाड्यातील नांदेड, उमरखेड, किनवट या भागात आज (9 सप्टेंबर) रात्रीपासूनच पावसास सुरुवात होणार आहे. 10, 11, 12 सप्टेंबर रोजी पाऊस वाढत जाणार आहे. तर 13 ते 18 दरम्यान हा पाऊस अतिशय जोर धरणार आहे.
विदर्भ
विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, जालना या जिल्ह्यांमध्ये 12 सप्टेंबरपासून पावसास सुरुवात होऊन 14 ते 18 दरम्यान हा पाऊस जोरात पडणार आहे.
कोकण आणि मुंबई
कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, कोकण, मुंबई, पालघर, ठाणे या ठिकाणी 13 ते 18 सप्टेंबर दरम्यान अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. मुंबईत काही भागांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोल्हापूरजवळील नद्यांच्या पातळीत वाढ होऊन 37 ते 43 फूट पर्यंत पोहोचू शकते. अहमदनगर, संभाजीनगर, जालना या भागात आतापर्यंत कोरड्या पट्ट्यात 13 ते 18 सप्टेंबर दरम्यान चांगला पाऊस पडून नद्यांना आणि तलावांना पाणी येण्याची शक्यता आहे. ही
नद्यांच्या पातळीत वाढ होऊन पूरयुक्त परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता
पश्चिम महाराष्ट्रातील धरणे आधीच भरलेली असल्याने या पावसामुळे त्यांच्यातून पाणी सोडण्याची आवश्यकता निर्माण होऊ शकते. यामुळे खालच्या भागात नद्यांच्या पातळीत वाढ होऊन पूरयुक्त परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. लातूरच्या मांजरा धरणातून आणि पुण्याच्या उजनी धरणातून पाणी सोडावे लागू शकते. सर्व शेतकऱ्यांनी या अंदाजाची नोंद घ्यावी आणि आपल्या शेतातील कामे यानुसार आखावीत. विशेषतः ज्वारीची पेरणी 18 सप्टेंबरनंतरच करावी. पाण्याच्या वाहतुकीच्या मार्गावर असलेल्या आणि नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या:
Rain News : मुंबईत पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं, नांदेड- परभणीसह मराठवाड्यात अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत