Maharashtra Weather Update : राज्यात तापमानाचा (Temperature) पारा चांगलाच घसरला आहे. थंडीचा जोर (Cold Weather) वाढल्यानं ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. अनेक जिल्ह्यात तापमानाचा पारा 10 अंशाच्या खाली आला आहे. या वाढत्या थंडीचा शेती पिकांवर (Agriculture Crop) देखील परिणाम होत असल्याचं चित्र आहे. त्यामुळं राज्यातील शेतकरी (Farmers) चिंतेत आहे. दरम्याम कोणत्या जिल्ह्यात किती तापमानाची नोंद झाली ते पाहुयात...


परभणीचा पारा घसरला, तापमान 7 अंशावर


परभणी जिल्ह्यात मागच्या 4 दिवसांपासून तापमानात मोठी घट झाल्याने सर्वत्र थंडीचा कडाका पडला आहे. आजही तापमान 7 अंशावर असल्याने जिल्हाभरात कडाक्याची थंडी पडली आहे. पहाटेपासूनच गार वारे सुटत असून हुडहुडी वाढली आहे. त्यामुळं सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांची संख्या ही घटली असून शाळकरी मुलं, वृद्धांना या थंडीचा जास्त त्रास होत आहे. तर गहू, हरभरा पिकांसाठी ही थंडी पोषक आहे.


महाबळेश्वरचा पारा 7 अंशावर 


सातारा जिल्ह्यातही थंडी वाढली आहे. यंदा पहिल्यांदाच महाबळेश्वरमध्ये दवबिंदू गोठले आहे महाबळेश्वरमध्ये तापमानाचा पारा 7 अंशावर गेला आहे. वेण्णालेक परिसरातील पारा 5 अंश सेल्सिअस आहे. 


नंदूरबार जिल्ह्याचा पारा 7 अंशावर 


नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यातही तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. नंदूबार जिल्ह्यात या वर्षातील सर्वात कमी म्हणजेच 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. या वाढत्या थंडीचा रब्बी पिकांना (Rabi Crop) फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. गहू , हरभरा, रब्बी ज्वारी या पिकांवर थंडीचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्वरीत उपाययोजना करण्याचे कृषी विभागानं आहवान केलं आहे. सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये कडाक्याचा थंडीमुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. 


पाहा कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?


मुंबई 17 अंश सेल्सिअस 
सातारा 10 अंश सेल्सिअस 
कोल्हापूर 14
सोलापूर 13
रत्नागिरी 16
जळगाव 7.5
जालना 12
ओरंगाबाद 8.2
पुणे 8.1
नाशिक 9
परभणी 11
ठाणे 20
उस्मानाबाद 9.9


उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. येथील अनेक जिल्ह्यात तापमान 10 अंशाच्या खाली गेले आहे. त्यामुळं चांगलीच हुडहुडी वाढली आहे. या वाढत्या थंडीचा परिणाम शेतकऱ्यांच्या पिकांवर देखील होत आहे. त्यामुळ शेतकरी चिंतेत आहेत. काही शेतकऱ्यांची रब्ब पीक या वाढत्या थडीमुळं धोक्यात आली आहे. कारण रोगांचा पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होत आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Nandurbar Weather : नंदूरबारमध्ये या वर्षातील सर्वात कमी तापमानाची नोंद, रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता