Maharashtra Rain : पुण्यासह राज्यभरात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. परतीच्या पावसामुळे जनजिवन विस्कळीत झाले आहे. शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परतीचा पाऊस परत जातो, पण दिवाळी आली तर अद्याप परतीचा पाऊस सुरुच आहे. त्याशिवाय गेल्या काही दिवसांमध्ये ठराविक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. पुणे, सोलापूर, जालना आणि कोल्हापूरमधील काही ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस झाला होता. यामागे काय कारण असेल... परतीचा पाऊस कधी जाणार? शहरातील पावसाचे प्रमाण का वाढले? यासारख्या सर्व प्रश्नांची उत्तरे शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापक आणि हवामान अभ्यासक प्रा. डॉ. सचिन पन्हाळकर यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. प्रा. डॉ. पन्हाळकर यांनी परतीचा पावसाबद्दलची उत्तरे दिली आहेत.. (शब्दांकन - नामदेव कुंभार)