Maharashtra Weather Forecast : मागील काही दिवसांपासून काही राज्यातील उकाडा प्रचंड वाढला आहे. उन्हाच्या चटक्यामुळे जीवाची लाहीलाही होत आहे. काही शहरातील तापमान 40 अंशसेलिअसपेक्षा जास्त गेले आहे.  त्यामुळे हवामान विभागाने उष्णतेची लाटेता इशारा दिला आहे. गरज नसेल तर घराबाहेर पडू नका, असा सल्लाही दिला आहे.  महाराष्ट्रातील अनेक स्थानकांवर आज कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवले गेले आयएमडीच्या अंदाजानुसार विदर्भात उष्णतेची लाट जाणवली अकोला येथे आज 18 मार्च रोजी सर्वाधिक 42.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.


राज्यात अनेक शहरांमध्ये वातावरण प्रचंड उकाडा झाला आहे. राज्यातील काही ठिकाणाचे तापमान 40 अंशसेल्सिअसच्या जवळ पोहचले आहे. दुपारी एक वाजता पुण्यातील तापमान 37-38  अंश सेल्सिअस इतके नोंदवले होते. पण अचानक वातावरणात बदल झाल्यामुळे पुण्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण झाले होते. हमामान विभागाने राज्यात काही ठिकाणी पावासाचा अंदाज वर्तवला आहे. 19 मार्च, IMD ने येथे सूचित केल्यानुसार 19 ते 21 मार्च या कालावधीत विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वेगळ्या ठिकाणी उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता आहे. तसेच दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात शनिवारी काही ठिकाणी तुरळक ठिकाणी हलका पाऊस /गडगडाटाची शक्यता आहे.





 




राज्यात काही ठिकाणी तापमानाचा पारा वाढल्याने उन्हाचे तीव्र चटके बसत आहेत. तर काही ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूमध्ये पुढील दोन ते तीन तासात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहिल तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुण, साताऱ्यातील घाट परिसरात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.