Maharashtra weather update: राज्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे .तर काही भागांमध्ये पावसाने उसंत घेतल्याचे चित्र आहे . आज सकाळपासूनच पालघर, बोईसर, डहाणू पश्चिम किनारपट्टी भागात पावसाची संततधार सुरू आहे . घाटमाथ्यावर पावसाचा इशारा असल्यामुळे थांबत थांबत मोठा पाऊस सुरू आहे . (Rain Alert)

Continues below advertisement

येत्या 24 तासात कोकण घाट परिसरात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे . या ठिकाणी मुसळधार तर राज्याच्या अंतर्गत भागात हलक्या सरी हजेरी लावतील . आज किनारपट्टी भागात पावसाचे तीव्र अलर्ट असून विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट आहे .

हवामान विभागाचा अंदाज काय ?

हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण गोवा मध्य महाराष्ट्रातील तुरळक भागात 23 ते 27 जून मध्ये तीव्र ते अति तीव्र पावसाची शक्‍यता आहे .मराठवाड्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असून 23 ते 27 जून दरम्यान कोकण मध्य महाराष्ट्रातही पावसाची हजेरी असेल .

Continues below advertisement

 

आज (23 जून ) रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांसह सातारा व पुणे घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे .तर ठाणे, पालघर ,नाशिक तसेच कोल्हापूरच्या घाट परिसरात पावसाचा यलो अलर्ट आहे . बुलढाणा ,अकोला, अमरावती व नागपूरमध्ये पावसाची शक्यता असून मराठवाड्यात परभणी हिंगोली व नांदेडमध्ये हलक्या सरींचा अंदाज आहे.

पुढील तीन दिवस हवामान कसे ?

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार 23 ते 27 तारखेपर्यंत कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भ व मराठवाड्यात पावसाची हजेरी राहणार आहे .आज संपूर्ण किनारपट्टी भागात पावसाचे तीव्र अलर्ट देण्यात आले आहेत .हे अलर्ट पुढील तीन दिवस कायम राहणार असून पावसाचा जोर वाढणार असल्याचं हवामान विभागाने सांगितले आहे . 

आज पासून पुढील तीन दिवस किनारपट्टी भागात पावसाची हजेरी राहणार आहे . 24 जून रोजी पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग यासह कोल्हापूर सातारा व पुणे घाट माथ्यावर पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय .जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली व नांदेड या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे .त्यानंतर कोकण किनारपट्टी मध्य उत्तर महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अलर्ट आहेत . 26 जून रोजी तळ कोकणासह  मराठवाडा आणि विदर्भात पावसाचे तीव्र अलर्ट देण्यात आले आहेत .

हेही वाचा

Chandrabhaga River: चंद्रभागा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ; वाळवंटातील मंदिरे पाण्याखाली; सहा भाविक थोडक्यात बचावले