Beed: "हे पाच पांडव आहेत तर मग कौरव कोण? असा सवाल विचारत क्षीरसागर आतून एकच आहेत, हा सर्व फॅमिली ड्रामा आहे. आमचं ठरलं पण काय ठरलं? कितीने ठरलं? कुठं ठरलं? असे म्हणत त्या बापलेकांनी काय ठरवलं? हा आमचा सवाल आहे. सुरूवातीला या पांडवांना संदिपकडे कुणी पाठवलं? कुणाचा पराभव करायचा होता? आता कोणाची लॉचिंग करण्यासाठी त्यांना इथं आणलं? जयदत्त यांना बीडच्या बाहेर हाकलण्यासाठी तर नव्हे", असे सवाल विचारत आमदार विनायक मेटेंनी क्षीरसागर काका-पुतण्या वर जोरदार टीका केली.


शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आमदार संदीप क्षीरसागर आणि जयदत्त क्षीरसागर यांच्यावर सडकून टीका केली आहे. आमदार संदीप क्षीरसागरांनी महसूल विभागाला एक पत्र दिलं आहे. त्यात बीडमध्ये होत असलेल्या जमिनीच्या खरेदी आणि विक्रीची माहिती मागवली आहे. आमदारांनीही माहिती मागवली. यामुळे बीडमध्ये सर्वसामान्य जमीन खरेदी आणि विक्री करणाऱ्या लोकांमध्ये भीती निर्माण झाली. लोक भयभीत झाले आहेत. याबद्दल अनेकांच्या तक्रारी माझ्याकडे आले आहेत. त्यामुळे ही माहिती त्यांनी कशासाठी मागवली आहे? याबद्दल मी विधिमंडळात देखील प्रश्न उपस्थित केला आहे. याची तक्रार अजित पवार आणि जयंत पाटील यांच्याकडे केली. आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे देखील आमदार संदीप क्षीरसागर यांची तक्रार करणार असल्याच मेटे म्हणाले आहेत.


पुढे बोलताना आमदार मेटे यांनी आमदार संदीप क्षीरसागर आणि त्यांचे काका जयदत्त क्षीरसागर यांच्यामध्ये विकास कामावरून सुरू असलेल्या श्रेय वादाचा देखील समाचार घेतला. बीड शहरामध्ये जी काही विकास कामे सुरू आहेत, ती देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मी आणि पंकजा मुंडे यांनी मंजूर करून आणली आहेत. ही कामं व्हावीत यासाठी क्षीरसागर बंधू माझ्याकडे आणि पंकजा मुंडे यांच्याकडे अनेक वेळा येऊन बसायचे. त्यामुळे आम्ही फडणवीस साहेबांसोबत बैठका घेऊन ही काम मंजूर करून आणली. आम्ही मंजूर केलेल्या कामाचे श्रेय क्षीरसागर बंधु घेत आहेत. त्यामध्ये आमच्या नावाचा कुठेही ते उल्लेख करत नसल्याच देखील मेटे म्हणाले आहेत. 


दोन दिवसापूर्वी आमदार संदीप क्षीरसागर यांचे पाच समर्थक हे शिवसेनेमध्ये दाखल झाले. यावेळी झालेल्या जाहीर कार्यक्रमात आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर त्यांनी जहरी टीका केली होती. यावरदेखील मेटेंनी भाष्य केलेय. बीड जिल्ह्यातला आतापर्यंत सर्वात थर्डक्लास आमदार संदीप क्षीरसागर यांना याच पाच लोकांनी निवडून आणलं आणि डोक्यावर बसवलं. यामुळे बीड करांना जो त्रास झाला आहे, ते येत्या काळात होणाऱ्या निवडणुकीमध्ये बीडची जनता दाखवून देईल.


राष्ट्रवादीतून शिवसेनेत पाच जणांनी प्रवेश केल्यानंतर त्यांचा उल्लेख पाच पांडव असा करण्यात आला. यावर बोलत मेटे यांनी हे जर पांडव असतील तर कौरव कोण? असा प्रश्न उपस्थित केला असून संदिप क्षीरसागरांनी यावर काहीतरी बोलायला पाहिजे होत. मात्र, ते काहीच बोलत नाहीत याचाच अर्थ हे सर्व एक असल्याचे सांगून ते अगोदरच आमदारकीसाठी ही डिलिंग झालेली होती. सत्ता भोगण्यासाठी क्षीरसागर हे नेहमीच फॅमिली ड्रामा करतात आमचं ठरलं असं म्हणत ज्या पाच लोकांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचं क्षीरसागरासोबत नेमकं काय ठरल आहे? कस ठरल आहे? आणि किती ने ठरल आहे? असा देखील प्रश्न उपस्थित केला आहे. 


सुरूवातीला या पांडवांना संदिपकडे कुणी पाठवलं कुणाचा पराभव करायचा होता आता कोणाची लॉचिंग करण्यासाठी म्हणून त्यांना परत आणलं आहे आपल्या घरातच सत्ता रहावी यासाठी क्षीरसागर फॅमिली ड्रामा करतात आणि त्यांच्या या ड्राम यामुळे बिल्डरांना आता पश्चाताप करावा लागत असून बीडची जनता क्षीरसागर यांच्या राजकारणाला त्रस्त झाली आहे असे एक ना अनेक आरोप विनायक मेटेंनी क्षीरसागर कुटुंबावर केले आहे


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha