दरम्यान, मनसेने 104 उमेदवार घोषित केले असले तरी अद्याप वरळी मतदारसंघातून आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. मनसे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार देणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मनसेचा मोठा चेहरा असलेले मनसे नेते बाळा नांदगावकर यांचं नाव तीनही याद्यांमध्ये नसल्याचे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज ठाकरे यांनी नांदगावकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरुन केवळ एका मतदारसंघापुरतं मर्यादित न राहता संपूर्ण राज्यभर पक्षाच्या प्रचारासाठी काम करण्याचे आदेश दिले आहेत.
मनसे उमेदवारांची यादी पाहा